आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:कोरोनामुळे शहर सोडताहेत श्रीमंत, 4.20 लाख जणांनी न्यूयॉर्क सोडले, येथे 1% ची वार्षिक कमाई 16 कोटी रुपये

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 1 मार्च ते 1 मेपर्यंत न्यूयॉर्क शहरातील 5% पेक्षा जास्त लोक शहर सोडून गेले
  • साऊथ फ्लोरिडा, कनेक्टिकटसारख्या ठिकाणी बरेच जण स्थलांतरित

(केविल क्विली)

अमेरिका कोरोनामुळे जगात सर्वाधिक प्रभावित देश आहे. येथे १५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि ९० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक परिणाम न्यूयॉर्कवर झाला आहे. येथे साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि २८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे न्यूयॉर्क शहरात राहणारे श्रीमंत शहर सोडून जात आहेत. वृत्तानुसार १ मार्च ते १ मे दरम्यान सुमारे ४.२० लाख जण शहर सोडून गेले आहेत. जे येथील एकूण लोकसंख्येच्या जवळपास ५% आहे. यातही एक मोठा गट त्या लोकांचा आहे जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत आणि शहरातील श्रीमंतांमध्ये धरला जातो. विशेष गोष्ट म्हणजे वार्षिक १६ कोटी रुपये कमावणारे शहरातील १% श्रीमंत इतर ठिकाणी निघून गेले अाहेत. यातील बहुतांशी एखाद्या बेटावर किंवा महागड्या ठिकाणी गेले आहेत, तर वार्षिक सुमारे ६७ लाख रुपये कमावणाऱ्या ८०% लोकांनी शहर सोडले नाही. न्यूयॉर्क विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक डॉ. किम फिलिप्स- फेन सांगतात, प्रत्येक समुदाय वेगवेगळ्या पद्धतीने वागतोय. येथून जाणारे बहुतांशी श्वेत आहेत. या जागांवर भाडे महागडे आहे आणि गरिबी कमी आहे. हे सांगणे चांगले असते की सर्व एकत्र आहेत, मात्र असे नाहीये.

विश्लेषणातून समजले की सर्वाधिक लोक अपर- ईस्ट साइड, वेस्ट व्हिलेज, सोहो आणि ब्रुकलिन हाइट्स साेडून गेले आहेत. श्रीमंत समजल्या जाणाऱ्या या चार भागात सुमारे ४०% लोकसंख्या कमी झाली आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांनीही शहर सोडले आहे.

साऊथ फ्लोरिडा, कनेक्टिकटसारख्या ठिकाणी बरेच जण स्थलांतरित

न्यूयॉर्क सिटीत १% श्रीमंतांची वार्षिक कमाई १६ कोटी रुपये आहे. ते महागडे बेट आणि शहरात स्थलांतरित झाले आहेत. दक्षिण फ्लोरिडा, कनेक्टिकट, पेन्सिल्वेनिया, न्यूजर्सी, मार्था विनयार्ड, केप कॉड, रोड आयलंड, हॅम्पटन, हडसन व्हॅली आणि जर्सी शोर त्यांच्या आवडीची ठिकाणे आहेत. त्यांना तथाकथित ‘कोरोना विषाणू शरणार्थी’ म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...