आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Richard Branson Space Travel LIVE Video Update; New Mexico News | Virgin Galactic Unity Spaceflight Launch Latest Photo

रिचर्ड ब्रॅन्सनची स्पेस ट्रिप:60 मिनिटांची अंतराळ यात्रा करुन परतले रिचर्ड ब्रॅन्सन, लँडिंग करताच म्हणाले - 'हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव'

न्यू मॅक्सिकोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॉकेटमध्ये भारताच्या सिरीशासह एकूण 6 जण

ब्रिटीश अब्जाधीश आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी रविवारी इतिहास रचला. ते व्हर्जिन गॅलॅक्टिक रॉकेट विमानात 60 मिनिटांची अंतराळ यात्रा करुन परतले. लँडिंग करताच त्यांनी आपला अनुभव संस्मरणीय असल्याचे म्हटले. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे पॅसेंजर रॉकेट विमान व्हीएसएस युनिटीमध्ये सवार होऊन ब्रॅन्सन अंतराच्या काठापर्यंत गेले आणि तिथे वजनहीनपणाचा अनुभव घेतला.

ब्रिटीश अब्जाधीश आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळातील ऐतिहासिक उड्डाण सुरू केले. खराब हवामानामुळे प्रक्षेपण वेळ दीड तास पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर रात्री 8.10 च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) विमानाने उड्डाण केले. व्हर्जिन समूहाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ही माहिती दिली होती.

उड्डाण करण्यापूर्वी, ब्रॅन्सन म्हणाले होते की माझे मिशन स्टेटमेंट आहे. माझे नातवंडे, तुमचे नातवंडे आणि प्रत्येकासाठी अंतराळ प्रवासाचे स्वप्न साकार करायचे आहे. एलोन मस्क देखील त्यांचा प्रवास पाहण्यासाठी पोहोचले आहेत. मस्क टेस्लाचे CEO आहेत आणि त्यांची कंपनी स्पेसएक्स स्पेस टूरिज्मची मोठी खिलाडी होण्याच्या प्रयत्नात आहे.

ब्रॅन्सल म्हणाले की, पुढच्या वर्षी कॉमर्शियल टूर सुरू करण्यापूर्वी ते स्वतः याचा अनुभव घेऊ इच्छिता. जर हे उड्डाण यशस्वी झाले तर त्यांची कंपनी व्हर्जिन अंतराळातील व्यावसायिक दौरा सुरू करण्याच्या दिशेने सर्वात मोठा मैलाचा दगड पार करेल.

रॉकेटमध्ये भारताच्या सिरीशासह एकूण 6 जण
रिचर्ड मिशन तज्ञ म्हणून स्पेसशिप -2 युनिटीशी जोडले गेले आहेत. भारताची लेक सिरीशा बांदलासह आणखी 5 लोकांनी उड्डाण भरली. या मोहिमेनंतर सिरिशा कल्पना चावलानंतर अवकाशात गेलेली दुसरी भारतीय वंशाची महिला बनली आहे. 34 वर्षीय सिरीशा एयरोनॉटिकल इंजीनियर आहे.

एयरोप्लेनने टेक ऑफ नंतर रॉकेटने प्रवास
कधी : 11 जुलै, रविवार
वेळ : रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार)
कुठून : स्पेसपोर्ट अमेरिका, न्यू मॅक्सिको
फ्लाइटचा कालावधी : 2.5 तास
किती वर जाणार : 90-100
येथे लाइव्ह पाहा :VirginGalactic.com, Twitter, YouTube और Facebook

बातम्या आणखी आहेत...