आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • RichardBranson Takes Historic Flight To Space Sirisha Bandla, It's Time To Make A Dream Come True: Branson

पहिला अंतराळ प्रवास यशस्वी:सिरिशा बांदलाने भारताची मान उंचावली,स्वप्न सत्यात उतरवण्याची ही वेळ : ब्रेन्सन

न्यूयाॅर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी विमानाने जगातील पहिला अंतराळ प्रवास यशस्वी

भारताची लेक सिरिशा बांदला आणि व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचेे मालक ब्रिटिश उद्योजक रिचर्ड ब्रॅनसन (७०) यांनी रविवारी खासगी विमानाने अंतराळ सफर केली. ब्रॅनसन, सिरिशासह क्रू सदस्यांनी व्हाइटनाइट कॅरिअर एअरक्रॉफ्टने रात्री ८:१५ वाजता उड्डाण केले. ८:३० वाजता पृथ्वीपासून ५०,००० फूट उंचीवर व्हीएसएस युनिटी वेगळे झाले आणि सर्वांना २.८० लाख फूट उंचीवर नेले. तेथे सर्वांनी वजनहीनता अनुभवली. ९:१० वाजता युनिटी पृथ्वीवर परतले.

ब्रॅनसन म्हणाले की, तुम्ही कधी स्वप्न बघितले असेल तर आता स्वप्नपूर्तीची वेळ आली आहे. आम्ही स्वप्ने बघणाऱ्या तरुण पिढीला आज आणि उद्याचे अंतराळवीर बनवू पाहत आहोत.

आनंद साजरा करताना सिरिशा-ब्रॅनसन व क्रू सदस्य. अंतराळ यात्रेदरम्यान व्हीएसएस युनिटीमध्ये क्रू सदस्य.

बातम्या आणखी आहेत...