आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एकाच दिवसात घट झाली आहे, परंतु भारतातील श्रीमंतांची संपत्ती मात्र वाढली आहे. जगातील अव्वल बर्नार्ड अर्नाल्ट, जेफ बेजोस, बिल गेट्सपासून वाॅरेन बफेपर्यंतच्या व्यक्तींची संपत्ती गेल्या चोवीस तासांत घटली आहे.
अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांची सर्वाधिक संपत्ती घटली आहे. ब्लूमबर्ग बिनियानर्स इंडेक्सनुसार दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत घट झाली. भारतातील उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाली.त्यात गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली. इंडेक्सनुसार चोवीस तासांत टॉप-२० मध्ये सहभागी १८ श्रीमंतांच्या संपत्तीत वेगाने घट झाली आहे.
जगातील अनेक श्रीमंतांची संपत्ती कमी झाली
जेफ बेझोस : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 1,63,909 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $१३९ अब्ज आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट : LVMH चे संस्थापक बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत 92,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $192 अब्ज आहे.
एलोन मस्क : स्पेसएक्सचे संस्थापक आणि टेस्काचे सह-संस्थापक एलोन मस्क यांच्या संपत्तीत १८,३५०२ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $180 अब्ज आहे.
वॉरेन बफे : प्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफे यांच्या संपत्तीत १८,१०२ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $113 अब्ज आहे.
बिल गेट्स : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीत ८,२६६ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती $125 अब्ज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.