आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनलँडमध्‍ये उजवी आघाडी जिंकली:पीएम मरिन यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर

हेलसिंकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलँड संसद निवडणुकीच्या तिरंगी लढतीत उजव्या विचारसणीच्या आघाडीने विजय प्राप्त केला आहे. पंतप्रधान सना मरिन यांची सोशल डेमोक्रॅटिक पार्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. यामुळे मरिन यांची पुन्हा निवडणूक लढण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. मध्यमार्गी- उजव्या नॅशनल कोलिशन पार्टीने(एनसीपी) सर्व फेऱ्यातील मतमोजणीनंतर विजयाचा दावा केला आणि २०.८% मतांसह अव्वल राहिला.