आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण आफ्रिकेत माजी राष्ट्रपती जॅकब जुमा यांना तुरुंगात पाठवण्याच्या विराेधात हिंसाचार भडकला आहे. समाजकंटकांनी क्वाजुलू-नटाल व गाॅटेंग प्रांतात लुटालूट केली. क्वाजुलू-नटाल हा जुमा यांचा बालेकिल्ला मानला जाताे. त्याव्यतिरिक्त डर्बन, जाेहान्सबर्ग व इतर शहरांतही हिंसाचार हाेत आहे. उपद्रवी भारतवंशीय लाेकांना लक्ष्य करू लागले आहेत. उपद्रवींनी भारतवंशीयांची दुकाने व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांची लूट सुरू केली आहे. त्याशिवाय इतर शेकडाे दुकाने, गाेदामे, घरे, वाहनांना आग लावून दिली जात आहे. जाळपाेळीसह महामार्ग बंद करण्यात आला आहे. दूरसंचार सेवा-सुविधा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
क्वाजुलू-नटाल व गाॅटेंग प्रांतातील जाळपाेळ व लुटालुटीत सुमारे १० हजार ४०० काेटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हिंसाचारात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ३ हजार लाेकांना अटक झाली आहे. संपूर्ण देशात खाद्य संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रपती सिरिल रामाफाेसा यांनी हा दक्षिण आफ्रिकेतील ९० च्या दशकानंतरचा सर्वात माेठा हिंसाचार असल्याचे म्हटले आहे. १९९४ मध्ये वर्णभेदाविराेधात हिंसक निदर्शने झाली हाेती. संरक्षणमंत्री नाेसिसिवे मापिसा-नककुला म्हणाले, हिंसाचाराशी निपटण्यासाठी सैन्याने २५ हजार सैनिकांची तैनाती केली आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमाेर भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेत समकक्ष नलेडी पँडाेर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पँडाेर यांच्याकडे भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. दक्षिण आफ्रिका सरकार कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शांतता नांदावी याला सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.
गुप्ता बंधूंमुळे जुमा अडचणीत; जवळीक भोवली
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जॅकब जुमा (७९) एक आठवड्यापासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात देशभरात हिंसाचार, लुटालूट व जाळपोळीच्या घटना घडत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती जाणून घेऊ.
जॅकब जुमा तुरुंगात का आहेत?
गेल्या महिन्यात न्यायालयाने जुमा यांना कोर्टाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते. जुमा भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या चौकशीला सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. हे प्रकरण जुमांच्या २००९-२०१८ राष्ट्रपती कार्यकाळातील आहे. कोर्टाने जुमांना १५ महिन्यांची कैद ठोठावली होती.
कोणत्या खटल्यात गैरहजर ?
जुमा यांच्यावर राष्ट्रपतिपदाचा दुरुपयोग करताना २ लाख ६० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यात तीन गुप्ता बंधू आहेत. अतुल, अजय, राजेश गुप्ता यांचा समावेश आहे. गुप्ता बंधूंनी जुमा यांच्या दोन मुलांना लाभ मिळवून दिला. दुबईत दडून बसलेल्या गुप्ता बंधूंच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू झाली आहे.
गुप्ता बंधूंशी जुमा यांचा संबंध काय?
अजय, अतुल आणि राजेश गुप्ता तिघेही भाऊ. ते उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी. तिघेही १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथे सहारा कॉम्प्युटर नावाने व्यवसाय सुरू केला. राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. २०१६ मध्ये जुमा यांना गुप्ता कुटुंबाने सरकारमधील अर्थमंत्र्याच्या नियुक्तीसाठी सल्ला दिला होता.
गुप्ता बंधू ‘जुप्ताज’ कसे बनले?
१९९४ मध्ये वर्णभेद संपल्यानंतर मंडेला सरकारने परदेशी गुंतवणूकदारांसाठी दरवाजा सुरू करण्यात आला. १९९० पासून आतापर्यंत जॅकब यांची बहीण, चार पत्नींपैकी एक पत्नी बोंगी नगेमा, मुलगी दुदुजिले, मुलगा दुदुजाने यांना गुप्ता बंधूंच्या कंपनीत मोठ्या पोस्टवर नियुक्त करण्यात आले. जुमा राष्ट्रपती होताच गुप्ता परिवाराने प्रगती केली. जुमाही श्रीमंत होत गेले. गुप्ता यांची जुमा यांच्याशी निकटता होती. त्यामुळे त्यांना जुप्ताज असे संबोधले जाते. गुप्ता बंधूंच्या तालावर जुमा वागायचे. त्यातून त्यांचे पक्षातील सहकाऱ्यांशी मतभेद वाढले.
गुप्ता बंधूंसोबत काय चाललेय?
गुप्ता बंधूंच्या विराेधात २०१६ मध्ये पहिल्यांदा भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाली होती. तिन्ही भावांची खाती अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबियात आहेत. या खात्यावरून अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. इंटरपोलने गुप्ता बंधूंच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. ते दक्षिण आफ्रिकेत पळून गेले
तेथे भारतीयांची स्थिती काय आहे?
दक्षिण आफ्रिकेत १४ लाख भारतीय राहतात. त्यापैकी एक तृतीयांश जुमा यांचा प्रांत क्वाजुलू-नटाल येथे काम करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.