आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Rishi Sunak Opinion On Racism Allegations I Buckingham Palace, Latest News, British PM Rishi Sunak,

ब्रिटीश PM म्हणाले- मी वर्णद्वेष अनुभवला:सुनक म्हणाले- मी भेदभाव सहन केला, तो कोणाशीही होऊ देणार नाही

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बकिंगहॅम पॅलेसमधील वर्णभेदाच्या आरोपांवर आपले मौन तोडले आहे. बोलताना जरी त्यांनी पॅलेसमधील वर्णद्वेषाचा थेट उल्लेख केला नाही. तरी सुनक म्हणाले की, वर्णभेदाविरोधात आवाज उठवला पाहिजे. असे आरोप जर कुणीही केले असतील तरीही त्यांची चौकशी व्हायला हवी.

भारतीय वंशाचे असलेले ब्रिटनचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, मी लहानपणी वर्णभेदाचा सामना केला आहे. लहान भावंडांसमोर असा प्रकार व्हायचा तेव्हा खूप वाईट वाटायचे, पण मला सांगायला आनंद होत आहे की, माझ्या लहानपणी मला जो काही अनुभव आला, तो अनुभव आज कुणालाही नसावा. कारण वर्णभेदाचा सामना करताना आपल्या देशाने बरीच प्रगती केली आहे. तर वर्णभेदाचा सामना करण्यासाठी अद्याप बरेच काम करणे बाकी देखील आहे.

ऋषी सुनक म्हणाले की, वर्णभेदाच्या मुद्द्यावर ते भाष्य करू शकतात, कारण ते स्वतःच याला लहानपणी बळी पडले होते.
ऋषी सुनक म्हणाले की, वर्णभेदाच्या मुद्द्यावर ते भाष्य करू शकतात, कारण ते स्वतःच याला लहानपणी बळी पडले होते.

ते शब्द ऐकल्यावर थरकाप होतो

वर्णभेदाच्या बाबतीत सुनक म्हणाले की, फक्त काही शब्द बोलले गेले. पण, त्या शब्दांचा डंख खूप होत असे. हे शब्द तुमच्या हृदयाला छेद देतात. अल्पसंख्याक गट आहे. तो नेहमी असे गृहीत धरतो की, त्याच्याबद्दल वर्णद्वेषी वृत्ती अंगीकारली जात आहे. पण, मला माझ्या देशाची अशी प्रतिमा दाखवायला मुळीच आवडणार नाही.

काय आहे प्रकरण, त्यावर PM सुनक वर्णद्वेषावर वक्तव्य केले

ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये वर्णद्वेष केल्याचा आरोप एका महिलेला केला होता. राजघराण्यातील सदस्याला यावरून राजीनामा द्यावा लागला. प्रिन्स हॅरींची पत्नी मेगन मर्केल यांनी आरोप केल्याचा दावा माध्यमांनी केला होता. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
​​

बातम्या आणखी आहेत...