आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटीश PM हाउसमध्ये ऋषींचे पाळीव कुत्र्यांसह वास्तव्य:लोक म्हणाले - भारतीय व डॉग दोघेही 10 डाउनिंग स्ट्रीटच्या आत, हेच कर्म

लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती व डॉग नोव्हासोबतचे आपले हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.  - Divya Marathi
ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती व डॉग नोव्हासोबतचे आपले हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे आपली पत्नी अक्षतासह ब्रिटीश पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाउनिंग स्ट्रीटवर पोहोचलेत. ऋषीने यासंबंधीचे आपले एक छायाचित्र 1 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ते भारतीयांच्या चांगल्याच पसंतीला उतरले आहे. या फोटोत ऋषी, त्यांच्या पत्नी अक्षता व कुत्रा नोव्हा 10 डाउनिंग स्ट्रीटच्या आत दिसून येत आहेत. युजर्सनी या फोटोवर भाष्य करताना हे कर्माचे फळ असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ब्रिटीश राजवटीत भारतात अनेक ठिकाणी इंडियन्स अँड डॉग्ज नॉट अलाउड अर्थात भारतीय व कुत्र्यांना प्रवेश नाही असे बोर्ड लावले जात होते. आता ऋषी आपल्या कुत्र्यासह ब्रिटनच्या सर्वात मोठ्या व महत्वाच्या इमारतीत पोहोचल्यामुळे अनेकांनी वेळ सर्वांचीच येते, असे मत व्यक्त केले आहे.

42 वर्षीय ऋषी सुनक ब्रिटनचे 200 वर्षांनंतरचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेत.
42 वर्षीय ऋषी सुनक ब्रिटनचे 200 वर्षांनंतरचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेत.

का खास आहे 10 डाउनिंग स्ट्रीट

10 डाउनिंग स्ट्रीट ब्रिटीश पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान व हेड ऑफिस आहे. ही लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिंस्टरमधील एक इमारत असून, ती डाउनिंग स्ट्रीवर आहे. ही इमारत सर्वप्रथम 1684 मध्ये बांधण्यात आली होती. ती बकिंगहॅम पॅलेस व संसद भवन वेस्टमिंस्टर पॅलेसच्या जवळ आहे. 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये 100 हून अधिक खोल्या आहेत.

शिमला इंग्रजांची विंटर कॅपिटल होती. येथील रॉयल शिमला क्लबमध्ये लावण्यात आलेल्या बोर्डवरुन 'भारतीय व कुत्र्यांना आत येण्याची परवानगी नव्हती', हे दिसून येते.
शिमला इंग्रजांची विंटर कॅपिटल होती. येथील रॉयल शिमला क्लबमध्ये लावण्यात आलेल्या बोर्डवरुन 'भारतीय व कुत्र्यांना आत येण्याची परवानगी नव्हती', हे दिसून येते.

आता वाचा युजर्सचे कमेंट्स

युजर्स, विशेषतः भारतीयांनी ऋषी सुनक यांच्या फोटोवर जबरदस्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. अनेकांनी हे इंग्रजांच्या कर्माचे फळ असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी लिहिले - एक काळ होता इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एक बोर्ड लावलेला असायचा -'भारतीय व कुत्र्यांना आत येण्याची परवानगी नाही. काळाचा महिमा पाहा, आज हे दोघेही इंग्लंडच्या सर्वात मोठ्या खुर्चीवर बसलेत. कालाय तस्मे नमः. वेळ सर्वांचीच येते.'

बातम्या आणखी आहेत...