आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Risk Of Blood Clots Lower After Vaccination, Higher Risk After Infection: Oxford University Resource

लंडन:लसीकरणानंतर रक्तातील गुठळ्यांचा धोका कमी, संसर्गानंतर जोखीम जास्त : ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधनातून दावा

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्ताच्या गुठळ्या तयार हाेण्याची जाेखीम लसीकरणाच्या तुलनेत काेराेना संसर्गामुळे जास्त आहे. एका अभ्यासातून हे समाेर आले आहे. काेराेनाची लस घेतल्यानंतर अनेक लाेकांनी रक्ताच्या गुठळ्या तयार हाेत असल्याच तक्रार केली हाेती. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधकांनी केलेल्या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये याबाबतचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रिटनच्या २.९० काेटी लाेकांशी संबंधित माहितीचे अध्ययन करण्यात आले. या सर्वांना काेराेना लसीचा एक डाेस देण्यात आला हाेता. त्यात दाेन स्थितींचा अभ्यास करण्यात आला. पहिली स्थिती थ्राेंबाेसायटाेपेनिया. यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खूप कमी हाेते. दुसरी स्थिती थ्राेंबाेएम्बाेलिक. काेराेना लस घेतल्यानंतर रक्त गाेठण्याची समस्या निर्माण हाेते. ऑक्सफर्डच्या प्राेफेसर ज्युलिया हिप्पसली-काॅक्स अभ्यास प्रकल्पात सहभागी हाेत्या. त्या म्हणाल्या, काेराेना लस घेतल्यानंतर काही लाेकांत विशिष्ट समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. अनेक वेळा मृत्यू हाेण्याचीही भीती आहे. लाेकांनी याबाबत जागृत राहण्याची गरज आहे. परंतु अशा प्रकारच्या समस्या काेराेना संसर्गानंतर निश्चितपणे जास्त हाेण्याची शक्यता आहे.

ॲस्ट्राझेनेका लसीबाबत तक्रारी आल्या होत्या
युराेपातील काही देशांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचा वापर (भारतात काेविशील्ड) थांबवला हाेता. ही लस घेतल्यानंतर अनेक लाेकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या हाेण्याची समस्या दिसून आली हाेती. काही लाेकांचा मृत्यूही झाला. परंतु नंतर तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यावरील बंदी हटवण्यात आली हाेती. त्यामुळेच हे अध्ययन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...