आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Risk Of Body Composition Deterioration Due To Gadgets; The Hump Is Coming Out, The Fingers Are Bending Due To The Mobile, The Side Effects Are Also Happening On The Eyelids

संशोधन:गॅजेट्समुळे शरीराची रचना बिघडण्याचा धोका; कुबड निघत आहे, मोबाइलमुळे बोटे वाकत आहेत, पापण्यांवरही होत आहे दुष्परिणाम

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुबड निघालेली पाठ, वाकलेले पंजे आणि ९० अंशांपर्यंत सरळ कोपर, छोटा मेंदू आणि डोळ्यांत पापण्यांचा दुहेरी थर. आगामी काळात माणसांचे शरीर असेच होऊ शकते. तंत्रज्ञानाचा अतिवापर आपल्याला शारीरिकदृष्ट्याही बदलत आहे. अमेरिकेच्या प्रमुख संस्थांमधील वेगवेगळ्या विषयतज्ज्ञांच्या संशोधनाआधारे स्मार्टफोन, लॅपटॉप व टीव्हीच्या अति वापराने मानवी संरचनेत संभाव्य बदलांवर संशोधन केले. ३डी इमेजही तयार केली.

कार्यालय किंवा घरामध्ये उशिरापर्यंत एकाच स्थितीत बसल्याने कुबड निघते मॅपले हॉलिस्टिक्सच्या आरोग्यतज्ज्ञ कॅलेब बॅके सांगतात, कार्यालयात दीर्घकाळ व घरात एकाच स्थितीत तासन‌्तास बसून राहिल्याने पाठीच्या कण्यावर ताण पडतो. यामुळे पाठ सरळ राहत नाही, वाकते. डोक्याला आधार देण्यासाठी मानेच्या स्नायूंना अधिक मेहनत करावी लागते. लागोपाठ दीर्घकाळ असे झाल्याने शरीर तीच स्थिती स्वीकारते. यामुळे कुबड निघण्याची शक्यताही वाढते.

प्रत्येक वेळी फोन पकडल्याने वाकत आहेत बोटे, कोपरांवर पडत आहे ताण मेड अलर्ट हेल्पच्या डॉक्टर निकोला सांगतात, स्मार्टफोन आपल्या हातात प्रत्येक वेळी असतो. ज्या वेळी आपण वापर करत नाही त्या वेळीही तो आपल्या हातातच असतो. तो पकडण्यासाठी आपले पंजे नेहमी एका खास स्थितीत असतात. यामुळे बोटे वाकतात. आपले कोपर नेहमी ९० अंशांवर स्थिर होऊ शकतात. जसे मोबाइलवर बोलत असताना राहतात. कोपराच्या नसांवर सातत्याने ताण पडल्याने असे होऊ शकते.

जीवनशैलीमुळे कमी होत आहे मेंदूची क्षमता तांत्रिक तज्ज्ञ जेसन ओ ब्रायन सांगतात, आपली जीवनशैली मेंदूची क्षमता कमी करत आहे. तंत्रज्ञानाचा आपण किती वापर करत आहोत, याकडे लक्ष द्यावे. यामुळे तुम्हाला कमीत कमी मेंदूचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे असे होत आहे. ज्यांची आपल्याला आवश्यकताच नाही अशा गोष्टी अनेकदा आपण पाहत-एेकत असतो.

निळ्या किरणांसाठी दुहेरी पापण्यांचा विकास शक्य टोलेडो विद्यापीठातील डॉक्टर कसून रत्नायके सांगतात, डिजिटल उपकरणांमुळे निळी किरणे सर्वाधिक निघतात. या किरणांमुळे अनिद्रा होत आहे. डोकेदुखी आणि डोळ्यांची दृष्टी कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी आपले शरीर दुहेरी पापण्या विकसित करू शकते. अधिक प्रकाश रोखण्यासाठी असे होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...