आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कमी झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा धोका, परंतु ट्रम्प-मस्कसारख्या व्यक्ती चारच तास झोपून सक्रिय जीवन जगताहेत

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगितले की, कमी झोप आणि स्मृतिभ्रंशात जवळचे नाते आहे. म्हणजे कमी झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प किंवा टेस्ला इंकचे संस्थापक एलन मस्कसह अनेक व्यक्ती रात्री जेमतेम तीन ते पाच तास झोपूनही निरोगी आणि सक्रिय जीवन कसे जगतात?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नव्या संशोधनात दावा केला की, सुमारे ५ टक्के लोकांत काही अशी जनुके असतात जी स्मृतिभ्रंशाला दूर ठेवतात. संशोधकांच्या मते, उंदरांवर केलेल्या संशोधनात आढळले की, विशेष जनुकांमुळे कमी झोप घेऊनही त्यांच्या मेंदूत विषाक्त प्रोटीन्स तयार होण्याची प्रक्रिया संथ राहिली. त्यामुळे त्यांच्यात स्मृतिभ्रंशाचा धोका उरला नाही. खरे तर डॉक्टर सात ते नऊ तास झोपण्याचा सल्ला देतात. परंतु काही जण चार तास झोपूनही प्रसन्न असतात. झोपेदरम्यान मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांतून विषाक्त पदार्थ निघतात. त्यांच्या जागृतीमुळे आपल्या मेंदू आणि मांसपेशींचा कायाकल्प होतो. संशोधक आणि न्यूरोलॉजीच्या तज्ज्ञ यिंग-हुई फू यांच्या मते, ‘झोपणे किंवा जागे राहण्यासाठी आपल्या मेंदूच्या अनेक भागांना सोबत काम करावे लागते. जेव्हा मेंदूचे हे भाग क्षतिग्रस्त होतात तेव्हा झोपणे किंवा चांगली झोप घेणे कठीण होते. हे नवे संशोधन नव्या जाणिवांची दारे उघडते, जेणेकरून या आजारांपासून कसे बचावता येईल. या निष्कर्षांमुळे मेंदूविकाराच्या रुग्णांना अधिक अधिक आरामदायक झोप घेणे आणि स्मृतिभ्रंशासारखी स्थिती दूर करण्याकामी नव्या औषधी विकसित केल्या जाऊ शकतात.’ प्रा. फू यांच्या टीमने यापूर्वी अशी पाच जनुके शोधली होती, जी कमी झोपेकरिता भूमिका निभावतात. या संशोधनात त्यांनी २ जनुकांच्या म्युटेशनचे परीक्षण केले. त्यांनी स्मृतिभ्रंशाचे सर्वात सामान्य रूप अल्झायमर्सने पीडित उंदरांच्या समूहाला दोन्ही जनुकांचे डोस दिले. तीन ते सहा महिन्यांनंतर त्यांच्या मेंदूच्या विश्लेषणात आढळले की उंदरांत इतर समूहातील उंदरांच्या तुलनेत अल्झायमर्समध्ये भूमिका निभावणारे असाधारण प्रोटीन कमी होते. दोन्ही जनुके आजाराच्या प्रगतीला संथ करू शकतात. त्यामुळेच ट्रम्प आणि मस्क यांच्या शरीरातही अशी जनुके असणे शक्य आहे.

एका दशकात स्मृतिभ्रंश पीडितांची संख्या वाढून १५ कोटी होऊ शकते
भारतीयांंत सध्या मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा ही लक्षणे जास्त आहेत. त्यांचा स्मृतिभ्रंशाची सुरुवात आणि प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात ५ कोटी लोक स्मृतिभ्रंशाने पीडित आहेत. यात ६०% गरीब व मध्यम उत्पन्न गटाच्या देशात राहतात. २०३० पर्यंत त्यांची संख्या ७.८ कोटी आणि २०५० पर्यंत १४ कोटी होईल. स्मृतिभ्रंश मृत्यूचे मृत्यूचे ७ वे कारणही आहे

बातम्या आणखी आहेत...