आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात रोबोचा विकास वेगाने होत आहे. रोबो रेस्तराँमध्ये वेटरपासून न्यूजरूममध्ये अँकरपर्यंच्या भूमिकेत वावरत आहे. असे असतानाही तो माणसाप्रमाणे हावभाव करण्यात खूप मागे आहे. विशेषत: डोळ्याने संवाद साधण्यात खूपच कमकुवत आहे.
इटलीच्या जेनोआ येथील इटालिएन तंत्रज्ञान संस्थेत याचे एक उदाहरण समोर आले आहे. तेथे मानव-रोबो संवादादरम्यान संशोधन समूह कॉन्टॅक्टला(कॉग्निटिव्ह आर्किटेक्चर फॉर कोलॅबोरेटिव्ह टेक्नॉलॉजीज)अनेक बाबींची माहिती मिळाली. संवादादरम्यान एका संशोधक टेबलावर ड्रमसोबत रोबो आयक्यूबसमोर बसला. दोघांच्या नजरा एकमेकांवर होत्या. दोघे ड्रम वाजवत हाेते. संशोधकांना दिसले की, खोलीतील लोक इशारे, लाइट मध्यम-तेज होण्यासोबत त्यांच्या पापण्या लवत नव्हत्या. रोबोची नजर थेट त्यांच्याकडे होती आणि डोळ्यात डोळे घालून संवाद करण्याच्या स्थितीत पापण्याची नैसर्गिक स्थिती दिसत नव्हती. फिनलंडमध्ये टॅम्परे युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ हेलेना किलावुओरी यांच्यानुसार, बऱ्याचदा असे मानले जाते की, माणसाकडून लक्ष आकर्षित करताना आणि भावना व्यवक्त करताना पापणी लवली जाते. चांगल्या संवादासाठी ते आवश्यक आहे. माणूस गरजेनुसार, पापणी न लवता एकाग्र राहू शकतो.
किशोरवयीन, प्रौढांना डोळे मिचकावणारे रोबो आवडतात
डोळ्यांच्या इशाऱ्याने माणूस नियमित संवाद करत आहे. त्यामुळे रोबो शास्त्रज्ञ डोळे मिचकावण्याचा मानसशास्त्रीय अभ्यास करत आहेत. यातून रोबो कशाप्रकारे स्वत:ला या स्थितीशी जुळवून घेतात हे कळते. किशोरवयीनांपासून प्रौढांपर्यंत डोळे मिचकावणारे रोबो आवडतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.