आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमेरिका, ब्रिटनसह 55 देशांत ‘रोबोट वकील’; 80 भाषांमध्ये देताहेत सेवा, खटल्याची तयारी होत आहे सोपी

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कायदेशीर लढाई जलद करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
  • पार्किंगचा दंड, खुनाच्याही खटल्यात उपयोगात आले

तुम्हाला एखाद्या रोबोटला वकील म्हणून घेणे आवडेल का? ऐकतांना हे विचित्र वाटते. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनसह ५५ देशांतील सुमारे ३०० लॉ फर्म अशा रोबोट वकिलांचा वापर करत आहेत. हे फर्म खटल्यांच्या तयारीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सॉफ्टवेअरचा वापर करतात, जे रोबोटचे एक रूप आहे. एआयशी संबंधित सॉफ्टवेअर ८० भाषांमध्ये सेवा देत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील जोशुआ ब्राउझर (२४) त्यांचे अॅप डू नॉट पे याला जगातील पहिला रोबोट वकील म्हणतात. डू नॉट पे अॅप वापरकर्त्यांना कायदेशीर पत्रांचा मसुदा तयार करण्यात मदत करते.

युजर्स त्याच्या चॅटबॉक्सला आपली समस्या सांगतात. जसे, अयोग्य पार्किंग प्रकरणात कसे अपील करायचे. लोक आपल्या शब्दांचा वापर करून युक्तिवाद टाइप करू शकतात. त्यानंतर मशील लर्निंग मॉडेलचे सॉफ्टवेअर युक्तिवाद कायदेशीरदृष्ट्या योग्य करते. सध्या ब्राउझरच्या कंपनीचे कार्यालय कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीत आहे. मात्र ब्राउझरने एक फर्म म्हणून त्याची सुरुवात लंडनमध्ये २०१५ मध्ये केली होती. तेव्हा ब्राउझर फक्त १८ वर्षांचा होता. ते सांगतात, मी किशोरावस्थेत लंडनला राहायचो.

मी चांगला चालक नव्हतो. अनेकदा मला अवैध पार्किंगचा दंड झाला. अपीलसाठी वकिलांचा सल्ला घेण्याइतके पैसे नव्हते. त्या घटना लक्षात ठेवून मी डू नॉट पे अॅप बनवले. आज या अॅपवर सुमारे १.५० लाख सशुल्क वर्गणीदार आहेत. यातील बहुतांशी अमेरिका व ब्रिटनचे आहेत. हे लोक विमा दावा, पर्यटक व्हिसा अर्ज आदींच्या तक्रारी करतात.

माणसाच्या तुलनेत रोबोट वेगाने व कमी खर्चात करताहेत काम
लंडनमध्ये द ३६ ग्रुप लॉ फर्मचे वकील सॅली हॉब्सन यांनी नुकतीच एका खून खटल्यात एआयचा वापर केला होता. त्यांना या खटल्यात १० हजारांपेक्षा जास्त कागदपत्रांचे लगेच विश्लेषण करायचे होते. एआयद्वारे हे शक्य झाले. त्याने माणसाच्या तुलनेत चार आठवडे वेगाने काम केले.

बातम्या आणखी आहेत...