आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:काेराेनाविराेधातील युद्धात राेबाेट ठरले रिअल हीराे, रुग्णसेवेबराेबरच घरपाेच साहित्य देण्याचीही सेवा

सॅनफ्रान्सिस्काे3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • इस्रायल व थायलंडमध्ये दुर्गम भागातही रुग्णांच्या फुप्फुसाची यंत्रमानवाद्वारे तपासणी

काेराेना विषाणूचा संसर्ग माणसांत वेगाने हाेताे. एक बाधित व्यक्ती शेकडाेंना बाधित करू शकते. रुग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर, परिचारिका, आराेग्य कर्मचाऱ्यांनादेखील संसर्गाचा धाेका असताे. त्यामुळेच यंत्रमानव अत्यंत वेगाने व कुशलतेने काेराेनाच्या विराेधातील युद्धात भूमिका निभावू लागले आहेत.  चीनमधील वुहानमध्ये एका अस्थायी स्वरूपातील रुग्णालयात काेराेना महामारी सुरू झाल्यानंतर राेबाेटच्या एका टीमने तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांची देखभाल केली. राेबाेटच्या माध्यमातून रुग्णांच्या भाेजनाची व्यवस्था करण्यात आली. वेळाेवेळी रुग्णांचे तापमान नाेंदवण्यात आले व यंत्राद्वारे रुग्णांशी संवादही साधला. अशाच प्रकारचा एक राेबाेट आहे- क्लाऊड जिंजर. चीनच्या क्लाऊडमाइंड्स कंपनीने त्याची निर्मिती केली. ही कंपनी बीजिंग व कॅलिफाॅर्नियात काम करते. क्लाऊडमाइंड्सचे अध्यक्ष कार्ल झाआे ह्यमनाॅइड राेबाेटबद्दल म्हणाले, हा यंत्रमानव उपयुक्त माहिती, संभाषण करणे, गायन-नृत्यासह मनाेरंजन एवढेच नव्हे तर स्ट्रेचिंग अभ्यासाद्वारे रुग्णांची देखभाल करताे. स्मार्ट फील्ड रुग्णालये पूर्णपणे राेबाेट्सच्या मदतीने चालवण्यात आली हाेती. एका छाेट्या मेडिकल टीमने रिमाेटच्या साहाय्याने रुग्णालयातील राेबाेटला नियंत्रित केले. रुग्णांना रिस्टबँड लावण्यात आले. रक्तदाब व इतर महत्त्वाचा डेटा या राेबाेटच्या मार्फत संकलित केला जात हाेता.  या राेबाेट्सने काही दिवस रुग्णांचा सांभाळ केला. त्यावरून राेबाेट महामारीसारख्या संकटाच्या काळात रुग्णांची चांगल्या प्रकारे देखभाल करू शकतात हे स्पष्ट झाले. त्याशिवाय आराेग्य कर्मचारी सुरक्षित अंतरावरून त्यांची मदत घेऊ शकतात. थायलंड, इस्रायल इत्यादी देशांत रुग्ण, डाॅक्टरांचा सल्ला घेण्यासाठी राेबाेटला भेटतात. काही राेबाेट रुग्णांच्या फुप्फुसाची तपासणी करतात. हे संपूर्ण काम व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे केले जाते. 

अमेरिका : आॅटाेनाॅमस व्हेइकलने तपासणी, माणसाची पडत नाही गरज

फ्लाेरिडाच्या मेयाे क्लिनिकने अमेरिकेत पहिल्यांदाच काेराेना टेस्टिंगसाठी आॅटाेनाॅमस व्हेइकल सेवा सुरू केली. ही प्रणाली नमुना घेऊन प्रयाेगशाळेत पाेहाेचवते. या प्रक्रियेत माणसाची गरज भासत नाही. संसर्गाची भीती नाही. वाॅशिंग्टनमध्ये डिलिव्हरी राेबाेटच्या माध्यमातून सामान पाठवण्याचे काम सुरू केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...