आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत 3 वर्षांत रोबो बाजार दुप्पट:फूड डिलिव्हरीतही रोबोचा होणार वापर

दुबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापूर्व स्थितीच्या तुलनेत आतापर्यंत दुबईच्या रोबो बाजारपेठेत १००% पेक्षाही जास्त वाढ होत आहे. पाच वर्षांआधीपर्यंत जिथे मलकल बाजारात रोबोच्या केवळ ७-८ कंपन्या होत्या, आता २५ पेक्षाही जास्त झाल्या आहेत. या स्थानिक स्तरावर संशोधन आणि विकासाचेही काम मोठ्या प्रमाणात करत आहेत. याचे मोठे कारण असे की, दुबई सरकार रोबोटिक्सच्या अनेक स्टार्टअप्सला पाठबळ देत आहे. आधी चीन आणि अमेरिकेतून पूर्ण तयार रोबो येत होते,आता दुबईतील बहुतांश कंपन्या येथे आपल्या रोबोंची जुळवणी करतात.

रस्त्यावर मुले-प्राण्यांपासून दूर राखण्यासाठी इनबिल्ट सेन्सर दुबईत रोबोसोबत नवा प्रयोग सुरू केला आहे. आता रोबो फूड डिलिव्हरीही करतील. त्यांच्या बॉक्समध्ये जेवण पॅक केले जाते आणि जीपीएस लोकेशनद्वारे डिलिव्हरीसाठी पाठवले जाते. एक्सपो २०२० दरम्यान यशस्वी चाचणीनंतर फूड डिलिव्हरी कंपनी तालाबाटने सात रोबोसह ही पथदर्शी सेवा सुरू केली आहे. रडार आणि ऑपरेटिंग सिस्टिमयुक्त हा डिलिव्हरी रोबो अन्य वाहने, कर्ज आणि एवढेच नव्हे तर एक जिज्ञासू फिरस्ती मांजरीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. अनेक इनबिल्ट सेन्सर आणि अल्गोरिदम लावले आहेत. हे मुले आणि पाळीव प्राण्यांपासून अंतर ठेवतात.

घरगड्याची जागा घेण्यासाठी तयार ह्युमनॉयड दुबईत घरातील नोकरीसाठी २५ हजार रु. महिना द्यावा लागतो. व्हिसा आणि मेडिकल सुविधा, एकदा आपल्या देशात येण्या-जाण्याचा खर्च, आठवड्यात १ सुटी, वर्षंात ३० दिवस सुट्या वेगळ्या देणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रामाणिकपणावर कायम संशय घेतला जातो तो वेगळा. ह्युमनॉयड रोबोमध्ये या गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. लहान मुलांच्या देखभालीत नोकर तर कधी-कधी गैरवर्तनही करू शकतो. मात्र, रोबो असे करत नाहीत. अली रिजा म्हणाले, हे नोकर आणि सेवकाची रिप्लेसमेंट आहे.

पुढे काय? १० वर्षांत दुबईत २ लाख रोबो तैनात होतील... जानेवारी २०२३ मध्ये दुबई रोबोटिक्स अँड ऑटोमेशन प्रोग्रामच्या(आर अँड ए) लाँचिंगदरम्यान दुबईचे राजे शेख हमदान बिन मोहंमद बिन राशिद अल मख्तूम म्हणाले, आम्ही दुबईला जगातील पहिल्या १० शहरांत आणू इच्छितो. येत्या १० वर्षांत सरकारी विभागांमध्ये २ लाख रोबो तैनात होतील. जागतिक रोबोटिक्स बाजार २०१९ मध्ये रु.५.१४ लाख कोटींचा होता. २०२७ पर्यंत हा १५.५२ लाख कोटी रु. होण्याची शक्यता आहे.

स्पेशल चाइल्ड ओळखतात रोबो स्पेशल चाइल्ड आणि ऑटिस्टिक मुलांसाठी हे रोबो खूप सोईस्कर आहेत. कारण, ते स्वायत्त निर्देश घेतात. त्यामुळे ते शाळेतील वर्गात अशा मुलांच्या वर्गमित्राप्रमाणे वागतात. हे सिग्नल आणि दिशेला ऑटिस्टिक मुलांसाठीही चांगल्या पद्धतीने समजतात. त्यामुळे शाळांत त्यांची मागणी आहे. हे कोणत्याही वेळी िवशेष मुलांच्या पालकांशी, त्यांच्या शरीरावर लावलेल्या कॅमेराच्या मदतीने व्हिडिओ कॉल करू शकतात. हा रोबो १५० पेक्षा जास्त उपभाषा आणि २५ पेक्षा जास्त भाषांमध्ये बोलू शकतो.

बातम्या आणखी आहेत...