आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Roche Antibody Cocktail Price | Roche Antibody Cocktail Launch In India Today At Cost Rs 60000 Thousand; News And Live Updates

भारताला मिळाले नवीन औषध:कोरोनाच्या अँटीबॉडी कॉकटेलचे डोस 60 हजार रुपयांना मिळणार, तज्ञ म्हणाले - यामुळे रुग्णालयाच्या प्रकरणातून वाचाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटीबॉडीच्या मल्टीडोसची किंमती 1.19 लाख रुपये

देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देशातून एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. रोशे इंडिया या औषध कंपनीने भारतात अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च केले आहे. कॅसिरिविमॅब आणि इम्डेविमॅबच्या या अँटीबायोटिक कॉकटेलच्या एका डोसची किंमती 60 हजार रुपये असणार आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याच अँटीबॉडीने उपचार केले होते. तज्ञांचे म्हणणे आहे की, सुमारे 70 टक्के लोक यामुळे रिकव्हर होत असून यांना रुग्णालयात जाण्याची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अँटीबॉडीच्या मल्टीडोसची किंमती 1.19 लाख रुपये
रोशे इंडियाने म्हटले की, ही अँटीबॉडी कॉकटेल 1200 एमजीची असून यामध्ये 600 एमजी कॅसिरिविमॅब आणि 600 इम्डेविमॅबचा समावेश असून याची किंमत 59 हजार 750 रुपये आहे. त्यासोबतच या अँटीबॉडीच्या मल्टीडोसची किंमत 1.19 लाख रुपये आहे. या एका पॅकमुळे दोन कोरोना रुग्णावर उपचार केल्या जाऊ शकतो. भारतात या औषधाचे मार्केटिंग सिप्ला कंपनी करत आहे.

भारताला जूनपर्यंत एक लाख पॅकेट मिळणार
या औषधाचा पहिला डोस भारतात आला असून दुसरा डोस 15 जूनला येणार असल्याचे रोशे आणि सिप्लाने म्हटले आहे. भारतात जूनपर्यंत एक लाख पाकिटे भारतात असतील ज्यामुळे सुमारे 2 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. ही औषधे मोठ्या रुग्णालये आणि कोविड केंद्रांना दिली जातील. सेंट्रल ड्रग स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने काही दिवसांपूर्वी अँटीबॉडी कॉकटेलच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती.

बातम्या आणखी आहेत...