आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Rocket Attack Near Rashtrapati Bhavan During Eid Prayers In Kabul, President Ashraf Ghani Likely To Be The Target

अफगाणिस्तानात रॉकेट हल्ला:काबुलमध्ये ईद नमाजच्या वेळी राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ला, राष्ट्रपती अशरफ गनी टार्गेट असण्याची शक्यता

काबुलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात ईदच्या नमाजदरम्यान रॉकेट हल्ला करण्यात आला. टोलो न्यूजनुसार, काबुलमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, त्या ठिकाणापासून राष्ट्रपती भवन अगदी जवळ आहे. हल्ल्याचा हेतू राष्ट्रपती अशरफ गनी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बकरीदच्या नमाजसाठी काबूलमधील एका मैदानात मोठ्या संख्येने लोक जमले होते, तेवढ्यात एकामागून एक रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत माहिती समोर आलेली नाही.

भारतीय पत्रकार दानिशही क्रॉसफायरिंगचे बळी ठरले होते
अफगाणास्तानातील कंधारमध्ये 16 जुलै रोजी तालिबान आणि सुरक्षादलादरम्यान झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. दानिश अमेरिकी न्यूज एजन्सी रॉयटर्सचे भारतातील चीफ फोटो जर्नालिस्ट हाेते. २०१८ मध्ये फीचर फोटोग्राफीसाठी पुलित्झर जिंकणारे दानिश पहिले भारतीय होते. ते गुरुवारी रात्री पाक सीमेलगतच्या कंधारमधील स्पिन बोल्डक जिल्ह्यात तालिबानी अतिरेकी आणि अफगाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांतील चकमकीचे वृत्तांकन करत होते. मुंबईच्या दानिश यांनी दिल्लीच्या जामिया विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...