आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​कंधार विमानतळावर हल्ला:​​​​​​​अफगाणिस्तानच्या कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 रॉकेट हल्ले, सर्व उड्डाणे रद्द; अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात युद्ध सुरुच

कंधार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंधारमधील परिस्थिती अशी आहे?

अफगाणिस्तानातील कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठे रॉकेट हल्ला करण्यात आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या विमानतळावर तालिबानी दहशतवाद्यांनी 3 रॉकेट हल्ले केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन रॉकेट हे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पडून त्याचा स्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु रविवारी संध्याकाळी हे पूर्ण होणार असल्याचे विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

या हल्ल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द
ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून यामुळे सर्व विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे तालिबानी दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण हा हल्ला यावेळी झाला ज्यावेळी हेरात, लष्कर गाह आणि कंधारला तालिबान्यांनी चारी बाजूंनी घेरले आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणी सैन्य आणि तालिबानी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे.

यामुळे करण्यात आला हल्ला?
कंधार हे अफगाणिस्तानातील दुसरे मोठे शहर आहे. येथील विमानतळाचा वापर अफगाणी लष्करांना शस्त्रे आणि रसद पोहोचवण्यासाठी केला जातो. तालिबानी दहशतवाद्यांना अफगाणी लष्करांना मिळणारी मदत येथून थांबवायची होती. याकारणामुळे तालिबान्यांनी या विमानतळावर कब्जा करायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन तीन आठवड्यात या भागातील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कंधारमधील परिस्थिती अशी आहे?
तालिबानी दहशतवाद्यांनी कंधार शहराला चारी बाजूंनी घेरले आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाण लष्कर आणि तालिबानी दहशतवादी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. यामुळे कंधारमधील हजारो लोक दुसऱ्या देशात विस्तापित होत आहे. काही लोकांनी पाकिस्तान आणि इराणसारख्या देशात जाऊन आश्रय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...