आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक कंगाली आणि अन्नधान्याच्या विवंचनेत सापडलेल्या पाकिस्तानला रशियाने मदत केली. त्याबदल्यात पाकिस्तान रशियाला धोका देत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने युक्रेनला रॉकेट आणि तोफगोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी ब्रिटनशी करार केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तान शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसोबत केला आहे. या कारखान्यांची मालकी पाकिस्तान सरकारकडे आहे. करारांतर्गत तोफखान्याच्या रॉकेटसह दारूगोळ्याचे १६२ कंटेनरची खेप एमव्ही ज्यूस्ट जहाजाने फेब्रुवारीमध्ये कराचीवरून जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवली आहे.
पाकिस्तानने धोका देण्याची चर्चा यासाठी होतेय कारण, रशियाने पाकिस्तानला एमव्ही लिला चेन्नई जहाजाद्वारे गव्हाची मोठी खेप पाठवली होती. आता रशिया कच्च्या तेलाची खेपही पाकिस्तानला पाठवत आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला दारूगोळा पोहोचवण्यात पाकिस्तानचे नाव पहिल्यांदाच समोर आले नाही. प्रथम ब्रिटनने एक एअर ब्रिजद्वारे युक्रेनला शस्त्र पाठवली होती, तेव्हाही पाकिस्तान त्याचा हिस्सा होता. ब्रिटनशिवाय पोलंडच्या एका कंपनीनेही युक्रेनला दारूगोळा पाठवण्यासाठी पाकिस्तानी कंपनीसोबत करार केला आहे. काही अन्य पाकिस्तानी आणि पाेलिश कंपन्याही या प्रकरणात सोबत काम करत आहेत. कॅनडाची एक कंपनी या प्रक्रियेत मध्यस्थ आहे. आधी पाकिस्तानने खांद्यावर ठेवून वापरली जाणारी एअर डिफेन्स सिस्टिम अनजा मार्क २ ची खेप पोलंडला निर्यात केली आहे. ब्रिटनने कथितरित्या युक्रेनला दारूगोळा आणि शस्त्र पोहोचवण्यासाठी एअर ब्रिजद्वारे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात रावळपिंडीतील नूर खान एअर बेसचा वापर केला.
बदल्यात पाकचे हेलिकॉप्टर अपग्रेड करणार युक्रेन दारूगोळ्याच्या बदल्यात युक्रेनने आपल्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपग्रेड करण्यासाठी पाकिस्तानला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. विमान इंधनांसोबत औद्योगिक सागरी गॅस टर्बाइन निर्मितीशी संबंधित युक्रेनची एक कंपनी कथितरित्या हेलिकॉप्टर अपग्रेड करण्यात पाकिस्तानची मदत करत आहे.
इम्रान यांचे भाषण प्रसारित करणाऱ्या वाहिनीवरच घातली बंदी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. या निर्णयाच्या काही तासांनंतर खासगी टीव्ही वाहिनी एआरवायने खान यांचे भाषण प्रसारित केले. यासंदर्भात पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने(पीईएमआरए) एआरवायवर बंदी घातली आहे. आता एआरवाय न्यूज सध्या ऑन एअर नाही. या संदर्भात एक संदेश दिसतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.