आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ruchira Became India's First Woman Ambassador To The United Nations Sneha Dubey Was Angry On Pakistan, Eenam Gambhir Had Said Terroristan

रुचिरा संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला दूत:पाकवर भडकल्या होत्या स्नेहा दुबे, ईनम म्हणाल्या होत्या 'टेररिस्तान'

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या महिला दूत बनल्या आहेत. त्या टी.एस. तिरुमूर्ती यांची जागा घेतील. रुचिरा या न्यूयॉर्कमधील संयुक्त मुख्यालयाच्या पहिल्या स्थायी महिला राजदूत बनल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असे अनेक मुत्सद्दी महिला होऊन गेल्या आहेत, ज्यांनी चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना अनेकदा चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही तुम्हाला अशाच 4 महिला अधिकाऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा आवाज संयुक्त राष्ट्रात गाजला होता.

1987 बॅचच्या सिव्हिल सर्व्हिसेस टॉपर रुचिरा कंबोज

रुचिरा कंबोज या भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1987 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या टॉपर देखील आहेत. रुचिरा या भूतानमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात फ्रान्समध्ये तिसरे सचिव म्हणून केली होती . फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी द्वितीय सचिवपदही भूषवले आहे.

रुचिरा यांनी युनेस्कोमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.
रुचिरा यांनी युनेस्कोमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर भडकल्या होत्या स्नेहा दुबे

यूएनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी म्हणून असलेल्या स्नेहा दुबे यांनी इम्रान खान यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या, संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि राहतील. पाकिस्तानने तात्काळ पीओके सोडावे. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसले आहे जे नेहमीच आपल्या शेजाऱ्यांना इजा पोहोचवतात.

यूएनमध्ये पाकिस्तानला सुनावल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पाहिला गेला. आणि लोक त्याचे कौतुक करताना थकत नव्हते. केंद्रीय लोकसेवा आयोगात स्नेहा दुबे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले होते. IFS साठी निवडलेल्या स्नेहा यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2014 मध्ये स्पेनची राजधानी माद्रिद दूतावासात पाठवले होते. त्यांनी पुण्याच्या प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले आहे आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून एम. फिल. केले आहे.

स्नेहा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता.
स्नेहा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता.

विदिशा मैत्रांनी पाकिस्तानच्या कमतरतांना इमरान यांच्यासमोर मांडले

2019 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर लगेचच इम्रान खान यांनी भाषण केले. त्यावेळीही इम्रान यांनी भारताची चुकीची प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रानला सडेतोड उत्तर दिले होते.

विदिशा यांनी म्हटले होते की, इम्रान खान यांचे भाषण द्वेषाने भरलेले असून ते जे काही बोलले ते खोटे आहे. त्यांनी जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने उघडपणे दहशतवादी ओसामा बिन लादेनचा बचाव केला. विदिशा म्हणाल्या की, मानवी हक्कांच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानने आधी आपल्या देशातील अल्पसंख्याकांची स्थिती पाहावी, ज्यांची संख्या 23 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर पोहोचली आहे. तेथे ख्रिश्चन, शीख, अहमदिया, हिंदू, शिया, पश्तून, सिंधी आणि बलूच यांना कठोर ईशनिंदा कायदा लागू केला जातो. त्यांचा छळ आणि जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. पाकिस्तानने इतिहास विसरू नये आणि लक्षात ठेवावे की 1971 मध्ये त्यांनी आपल्याच लोकांची कत्तल केली होती.

2009 मध्ये प्रशिक्षणादरम्यान, विदिशा यांना उत्कृष्ट प्रशिक्षण अधिकारी म्हणून सुवर्णपदकही मिळाले होते.
2009 मध्ये प्रशिक्षणादरम्यान, विदिशा यांना उत्कृष्ट प्रशिक्षण अधिकारी म्हणून सुवर्णपदकही मिळाले होते.

विदिशा मैत्रा या 2009 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. विदिशा यांनी 2008 मध्ये नागरी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. नागरी सेवा परीक्षेत विदिशाने संपूर्ण देशात 39 वा क्रमांक पटकावला होता.

पौलोमी त्रिपाठींनी दाखवून दिले पाकिस्तानचे वास्तव

ही 2017 ची गोष्ट आहे. जेव्हा UNGA मधील भारतीय मिशनच्या प्रथम सचिव, पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानचा खोटा मुखवटा उघड केला होता. पाकिस्तानच्या गाजाचे चित्र दाखवून ते काश्मीरचे चित्र असल्याचे सांगत तेथील स्थितीबद्दल दु:ख व्यक्त करत आहे. पौलोमी म्हणाल्या की, पाकिस्तान दहशतवादावर जगाची दिशाभूल करत असून त्यांनी पाठवलेले दहशतवादी काश्मीरमध्ये तोडफोड करत आहेत. त्याच वेळी, 2018 मध्ये, त्यांनी संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी उपस्थित केलेल्या काश्मीर प्रश्न आणि कलम 370 रद्द केल्यानंतर मुलांच्या दयनीय स्थितीचा दावाही नाकारला होता.

कोलकाता येथील पौलोमी यांनी जेएनयूमधून एमए आणि एम. फिल. केले आहे. त्या सेंटर फॉर स्टडी ऑफ रिजनल डेव्हलपमेंटच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांची 2006 साली महसूल सेवेसाठी आणि 2007 साली परराष्ट्र सेवेसाठी निवड झाली होती. 2009 ते 2013 पर्यंत त्यांनी दूतावासात काम केले आहे.

पौलोमी त्रिपाठी या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या सदस्या आहेत.
पौलोमी त्रिपाठी या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या सदस्या आहेत.

ईनम गंभीर यांनी पाकिस्तानला म्हटले होते 'टेररिस्तान'

2005 बॅचच्या IFS अधिकारी ईनम गंभीर यांनी 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या काश्मीरबाबत केलेल्या खोट्या युक्तिवादांना समर्पक उत्तर दिले होते. त्याचवेळी 2017 मध्ये त्यांनी UN मध्ये पाकिस्तानला दहशतवादी म्हटले होते.

ईनम गंभीर या UN मध्ये देशातील सर्वात तरुण स्थायी सचिव आहेत.
ईनम गंभीर या UN मध्ये देशातील सर्वात तरुण स्थायी सचिव आहेत.

ईनम गंभीर या UN मध्ये भारताच्या स्थायी मिशनच्या पहिल्या सचिव आहेत. 2008 ते 2011 या कालावधीत अर्जेंटिनामधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या गंभीर यांची पहिली परदेशी पोस्टिंग माद्रिदमध्ये झाली होती, जिथे त्यांनी स्पॅनिश भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. भारत-पाकिस्तान संबंधांचे तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.

बातम्या आणखी आहेत...