आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ काबूलला दाखल झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे विशेष प्रतिनिधी जे.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ आले आहे. भारताचे पथक तालिबानच्या सदस्यांशी चर्चा करेल. सोबतच अफगाणी नागरिकांना मानवी मदत करण्याविषयी चर्चा केली जाईल. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय संघटनांशी देखील चर्चा केली जाईल.
20 % भाग आतापर्यंत रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी लक्झेम्बर्गच्या संसदेला व्हिडिओ संदेशातून सनसनाटी दावा केला आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत २४३ जणांचा मृत्यू झाला. दोन लाख मुलांचे रशियाने अपहरण केले. १३९ मुले बेपत्ता आहेत. झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय बालदिनी म्हणाले, रशियाचे हल्ले भ्याडपणाचे प्रतीक आहे. त्यातच आता जॅपोरिजिया अणुप्रकल्प बंद केला जाणार असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले. लुहान्सकचे गव्हर्नर शेरही हैदेही म्हणाले, या प्रकल्पात सुमारे ८०० लोकांनी आश्रय घेतला आहे. रशियाच्या हवाई हल्ल्यामुळे सुरक्षित मार्ग मिळत नाही. अमेरिकेने युक्रेनला साडेपाच हजार कोटी रुपये देऊ केले. त्यामुळे रशियाचा तिळपापड झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.