आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia And Ukain Waar | Marathi News | Biden To Find 'friends', Putin To Watch Nuclear War Game; US Emergency Meeting With NATO Allies

युक्रेन संकट:बायडेन यांना ‘मित्रांचा’ शोध, पुतीन आण्विक वॉरगेम पाहण्यास जाणार; अमेरिकेची नाटोच्या सहकारी देशांसोबत आणीबाणीची बैठक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर संकट असतानाच शुक्रवारी मोठे वळण आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटोच्या सहकारी देशांची आणीबाणीची बैठक बोलावली आहे. रशिया हल्ला करू शकतो, हे लक्षात घेऊन बायडेन यांना मित्रराष्ट्रांचा शोध आहे. नाटोतील सदस्य राष्ट्र जर्मनी, तुर्की यांच्याकडून बायडेन यांना अपेक्षित असा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे बायडेन यांनी नाटो संघटनेबाहेर देशांसोबत संपर्क साधला आहे. बायडेन कूटनीतीच्या आधारे युक्रेन संकटात अमेरिकेची भूमिका बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

युक्रेन सीमेवर तैनात रशियन सैन्याचा आण्विक वॉरगेम पाहण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन स्वत: जाणार असल्याचे सांगण्यात येते. सीमेवर दीड लाख सैन्य तैनात केलेले असतानाच आता पुतीन तेथे जाणार असल्याने त्यास महत्त्व आले आहे. वॉरगेममध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसह उत्तर तसेच दक्षिणेकडील सागरी क्षेत्रातील सैनिकही सहभागी होतील. त्यामुळे दबाव वाढणार आहे.

महिनाभरात रशियाने सीमेवर ५० हजारांवर सैनिक वाढवले : अमेरिका
गेल्या एक महिन्याच्या काळात रशियाने युक्रेन सीमेवर ५० हजारांवर सैनिक वाढवल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. सध्या युक्रेनच्या सीमेवर रशियाचे सुमारे २ लाख सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेन सीमेवरून सैन्य कपात करत असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

नाटोच्या बैठकीत कमला हॅरिस सहभागी; जर्मनी-रशियावर निर्बंधाचा इशारा दिला
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस शुक्रवारी नाटोच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. ही बैठक जर्मनीत आयोजित करण्यात आली. नाटो सरचिटणीस स्टॉलबर्ग यांच्यासमवेत ही बैठक झाली. युक्रेनवर हल्ला झाल्यास अमेरिका रशियावर कडक निर्बंध लागू करेल. अमेरिकेला नाटोसह इतर देशांकडून समर्थन मिळत असल्याचा दावाही हॅरिस यांनी केला.

युक्रेन सीमेवर शाळेवर बॉम्ब कोसळला; ३ शिक्षक जखमी

गुरुवारी युक्रेन सीमेवरील लुंहासकामध्ये एका शाळेवर बॉम्ब कोसळल्याने तीन शिक्षक जखमी झाले. सुदैवाने त्यात एकही विद्यार्थी जखमी नाही. या भागात रशियन समर्थक बंडखोर गट सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठ वर्षांपासून फुटीरवादी गट सातत्याने हल्ले करत आहे. अलीकडच्या वादामुळे फुटीरवादी गटाने तणाव वाढवण्याचे काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...