आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia And Ukrain War | Marathi News | One And A Half Million Troops Preparing To Attack The Ukrainian Border

रशियाचा कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला:युक्रेनच्या सीमेवर दीड लाख जवान हल्ला करण्याच्या तयारीत

कीव्ह/मॉस्को6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने शेजारील युक्रेन देशाच्या सीमेवर दीड लाखापेक्षा जास्त जवान तैनात केलेले आहेत. या जवानांच्या तुकड्या सीमेवर हल्ल्याच्या पवित्र्यात ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे रशिया आता कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिले आहे. रशियाने लांब पल्ल्याच्या तोफा, रॉकेट लाँचर्स हल्ल्याच्या पोझिशनमध्ये ठेवल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली. तथापि, अमेरिकेनेच १६ फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याचे वृत्त दिलेले आहे.

रशियासोबत तत्काळ बैठक घेण्यात यावी : युक्रेन
दरम्यान, सीमेवर हल्ल्याची शक्यता असतानाही युक्रेनने रशियासोबत तत्काळ बैठक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले, सीमेवर लष्कर व युद्धाच्या सज्जतेला इतका वेग का दिला जात आहे, हे सांगण्याची विनंती आम्ही रशियाला केली. मात्र त्याकडे रशियाने डोळेझाक केली. ते म्हणाले, रशियासोबत ४८ तासांच्या आत तत्काळ बैठक व्हावी.

कीव्हमध्ये युद्धजन्य स्थितीतही फुलतंय प्रेम
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये युद्धजन्य स्थितीचा तणाव असतानाही लोकांत व्हॅलेंटाइन डेनिमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

बातम्या आणखी आहेत...