आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा दावा:रशियाने रणनीती बदलली; कीव्हऐवजी आता डोनबास

कीव्ह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कीव्हवरील हल्ले थांबले

युक्रेनवरील रशियन हल्ले सुरूच आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर अटलांटिक महासागरात आण्विक पाणबुड्या उतरवल्या आहेत. त्यातच युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले रशियाने थांबवल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने केला आहे. अधिकारी म्हणाले, रशियाने आता कीव्हवर वर्चस्व मिळवण्याऐवजी डोनबास प्रांतावर वर्चस्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डोनबासच्या दक्षिण किनारपट्टीवरील मारियुपोलमध्ये युद्ध सुरू आहे. या शहरांवर वर्चस्व मिळवण्याची रशियाची योजना आहे.

त्याचबरोबर कीव्हला इतर शहरांकडून मिळणारी रसद थांबवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दोनेत्स्क व लुहान्स्कमध्ये तैनात जवानांना खारकीव्ह व इजिमच्या दक्षिणेकडील भागात चढाई करणाऱ्या सैनिकांसोबत जोडण्याचेही मनसुबे आहेत, हे बदललेल्या योजनेतून दिसून येते. रशियाचे उपप्रमुख कर्नल सर्गेई रुडस्काई म्हणाले, युक्रेनच्या लढण्याच्या क्षमतेला कमी करण्याचे मुख्य उद्दिष्ट आम्ही साध्य केले आहे. रशियन सैन्य डोनबासच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे. डोनबास औद्योगिक शहर आहे. येथील मोठा समुदाय रशियन भाषिक आहे. २०१४ नंतर रशिया समर्थित फुटीरवादी युक्रेनच्या सैन्याशी लढत आले आहेत.

रशियासोबत चर्चेची योग्य वेळ : युक्रेन

रशियासोबत कूटनीतीचा प्रयत्न केला जात आहे. रशिया महत्त्वाच्या ठिकाणांवर थांबला आहे. चर्चेची स्थिती महत्त्वाची ठरेल, असे युक्रेनने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची पोलंड दौऱ्यात अमेरिकन सैनिक, स्थलांतरितांना मदत करणाऱ्यांशी चर्चा.

काळ्या सागरात रशियाने ४ कलिब्रू क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. त्यात जिटोमिर क्षेत्रातील लष्करी सामग्रीचे तळ उद्ध्वस्त झाले.

युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत १ हजार ३५१ सैनिकांचा मृत्यू झाला. पण मृतांची संख्या दहापट जास्त असल्याचा युक्रेनचा दावा.

बातम्या आणखी आहेत...