आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वॉशिंग्टन:अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हस्तक्षेपासाठी रशिया, चीन, इराण लागले कामाला!

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर खोटे पसरवण्याचा प्रयत्न, नॅशनल काउंटर इंटेलिजन्स सेंटरचा इशारा

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशिया, चीन आणि इराण हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल काउंटर इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी सेंटरच्या संचालिका विलियम इव्हानिया यांनी दिला आहे. ते उमेदवार आणि त्यांच्या राजकीय मोहिमांविषयीची ती गोपनीय माहिती त्यांना फायदा व्हावी म्हणून लीक करू शकतात. निवडणूक यंत्रणेशी निगडित केंद्रातील आणि राज्यातील सर्व नेटवर्कमध्ये हॅक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हॅकर्सवर अधिकारी नजर ठेवून आहेत.

इव्हानियांनुसार, रशिया, चीन आणि इराणसारख्या देशांच्या संस्था अमेरिकन मतदारांची पसंती आणि मनोवृत्तीवर परिणाम करण्यासाठी पारंपरिक न्यूज मीडिया तसेच प्रादेशिक मीडिया साइट्स वापरत आहेत. कोरोना महामारी आणि अलीकडेच कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांमुळे पेटलेल्या आंदोलनामुळे या देशांना त्यांच्या हेतूसाठी अमेरिकेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आयता मुद्दा मिळाला आहे.

गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले, अमेरिकेच्या धोरणांवर आपल्या बाजूने प्रभाव पडावा अशी चीनची इच्छा आहे. नेत्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्नही चीनकडून सुरू आहेत. त्याच वेळी, रशियाचे उद्दिष्ट अमेरिकेचे जगातील वर्चस्व कमी करणे आहे. रशिया अमेरिकेमध्ये इंटरनेट ट्रोलच्या माध्यमातून खोटे पसरवत आहे, जेणेकरून लोकशाही प्रक्रियेचा आत्मविश्वास कमी होईल. इराणदेखील प्रादेशिक माध्यमांमध्ये प्रचाराला चालना देत आहे. तसेच अमेरिकाविरोधी कंटेंट पसरवत आहे. दरम्यान, इव्हानियांनी अमेरिकेच्या नागरिकांना माहितीकडे चिकित्सकपणे पाहण्याचे, त्यांचे स्रोत तपासण्यासाठी आणि सोशल मीडिया माध्यमांवर कोणताही कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी सायबर सिक्युरिटीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांनी इव्हानियांच्या विधानात तपशील नसल्याचे सांगितले.

मागील निवडणुकीत रशियावर आरोप
२०१६ च्या अमेरिकन निवडणुकीत रशियावर हस्तक्षेप केल्याचा आरोप होता. रशियाने डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे नुकसान करणारे ईमेल लीक केले असा आरोप झाला होता. रशियाच्या इंटरनेट रिसर्च एजन्सीने राजकीय मतभेद निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटचीही चौकशी सुरू झाली होती.