आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Coronavirus Vaccine Sputnik V Update ; President Vladimir Putin's Daughter's Body Temperature Drops After Vaccinated

जगातील पहिल्या व्हॅक्सीनचे अपडेट:पुतिन यांच्या मुलीला व्हॅक्सीनचा डोस दिल्यानंतर शरीरातील तापमान घटले, मग अचानक वाढले; पहिल्या व्हॅक्सीनचा पहिला फोटो जारी

मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका आणि ब्रिटनने रशियावर लावला फॉर्म्युला चोरीचा आरोप

अधिकृतरित्या कोरोना व्हॅक्सीन रजिस्टर करणारा रशिया पहिला देश बनला आहे. व्हॅक्सीनचा पहिला डोस राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला देण्यात आला. डोस दिल्यानंतर डॉक्टरांना शरीरात बदल झालेले दिसले. पहिला डोस दिल्यानंतर शरीराचे तापमान 38 डिग्री होते. दुसऱ्या डोसनंतर 37 डिग्री झाले. परंतु, नंतर अचानक तापमान वाढले आणि काही वेळेनंतर सामान्य स्थितीत आले.

व्लादिमीर पुतिन यांना दोन मारिया आणि कॅटरीना नावाच्या मुली आहेत. दोघींपैकी कोणाला लस दिली आहे, याची माहिती पुतिन यांनी दिली नाही. परंतू, डोस दिल्यानंतर मुलीची तब्येत ठीक होत असल्याचे पुतिन यांनी सांगितले. मुलीच्या शरीरात अँटीबॉडीजची संख्याही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियाने तयार केलेले जगातील पहिले कोरोना व्हॅक्सीन 'स्पुतनिक-वी'
रशियाने तयार केलेले जगातील पहिले कोरोना व्हॅक्सीन 'स्पुतनिक-वी'

दावा- 20 देशांनी व्हॅक्सीनची ऑर्डर दिली

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितल्यानुसार, जगभरातील 20 देशांनी आमची व्हॅक्सीन स्पुतनिक-वीसाठी प्री-ऑर्डर दिली आहे. रशियाचा डायरेक्ट इंवेस्टमेंट फंड व्हॅक्सीनला मोठ्या स्तरावर बनवण्यासाठी आणि परदेशात प्रमोट करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. रशियातील एका वेबसाइटने दावा केला आहे की, भारत, सौदी अरब, इंडोनेशिया, फिलीपींस, ब्राझील, मॅक्सिकोसारख्या देशांनी व्हॅक्सीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू

रशियान वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या अखेरपर्यंत 20 कोटी डोज तयार करण्याची योजना आखली आहे. यातील तीन कोटी डोस रशिया आपल्यासाठी ठेवणार आहे. व्हॅक्सीनचे उत्पादन सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी रशिया सौदी अरब, ब्राझील, भारत आणि फिलीपींससारख्या देशात करण्याचा विचार करत आहे.

पहिल्या उपग्रहाच्या नावावर ठेवले व्हॅक्सीनचे नाव

रशियाने आपल्या व्हॅक्सीनेच नाव देशातील पहिला उपग्रह स्पुतनिक-वी च्या नावावर ठेवले आहे. हा उपग्रह रशियाने 1957 मध्ये लॉन्च केला होता. रशियाने काही महिन्याभरापूर्वीच संकेत दिले होते की, त्यांच्या व्हॅक्सीनचे ट्रायल मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि 10-12 ऑगस्टपर्यंत व्हॅक्सीनला रजिस्टर करणार आहेत. परंतू, या व्हॅक्सीनबाबत अमेरिका आणि ब्रिटेनचा रशियावर विश्वास नाही. रशियावर व्हॅक्सीनचा फॉर्म्युला चोरण्याचा आरोप दोन्ही देश लावत आहेत.

बातम्या आणखी आहेत...