आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचा युक्रेनच्या शॉपिंग मॉलवर क्षेपणास्त्र हल्ला:16 ठार, 59 हुन अधिक जखमी; मॉलमध्ये हजाराहून अधिक लोक होते

कीव्ह/मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनच्या क्रेमेनचुक शहरातील एका शॉपिंग मॉलवर क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 59 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला झाला तेव्हा मॉलमध्ये हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी युक्रेनच्या आपत्कालीन सेवा प्रमुखांनी हल्ल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढू शकतो.

रशियन सैन्य लिसिचेन्स्क शहराजवळ पोहोचले
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध मंगळवारी 123 व्या दिवशीही सुरू आहे. रशियन फौजा अगदी जवळ आल्याने युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी लिसिचेन्स्कच्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.

पोलंडमध्ये रशियाच्या नष्ट झालेल्या टॅंकचे प्रदर्शन
युक्रेनने पोलंडच्या वॉर्सॉ शहरात रशियाच्या नष्ट झालेल्या रणगाड्यांचे प्रदर्शन ठेवले आहे. हे रणगाडे युक्रेनच्या शहरांवर हल्ले करत होते. आता ते पोलंडमध्ये तसेच इतर युरोपीय देशांमध्ये प्रदर्शनासाठी पाठवण्यात येणार आहेत.

रशिया 1918 नंतर प्रथमच परदेशी कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरला
या हल्ल्यांमुळे पाश्चिमात्य निर्बंधांचा परिणाम रशियावर दिसू लागला आहे. रशिया 1918 नंतर प्रथमच परदेशी कर्जाचा हप्ता फेडू शकला नाही. जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या व्यवहारांवर बंदी घातल्यानंतर, रशियाने आपल्या चलनात, रुबलमध्ये पैसे देण्याची ऑफर दिली, जी अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या इतर देशांनी नाकारली.

27 मे रोजी रशियाला विदेशी कर्जावरील $100 दशलक्ष व्याज द्यायचे होते, ज्यावर एक महिन्याचा वाढीव कालावधी होता. असे असूनही तो रक्कम परत करू शकला नाही.