आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 1 जानेवारी रोजी युक्रेनने रशियन-व्याप्त डोनेस्टकवर क्षेपणास्त्रे डागली. यावएळी 400 रशियन सैनिक मारले आहेत, असा दावा युक्रेनच्या लष्कराने केला. पण रशियन सैन्याने हा दावा फेटाळला आहे. या हल्ल्यात त्यांचे फक्त 89 सैनिक मारले गेले, असे रशियाने सांगितले.
रशियाने ठार झालेल्या सैनिकांची संख्या लपवण्याची ही पहिलीच वेळ नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर 2 मार्चपर्यंत 15,000 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र रशियाने केवळ 500 सैनिक मारले गेल्याचे सांगितले होते. 25 मार्च रोजी दुसरे निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये केवळ 1,351 सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी झाली. तेव्हापासून युद्धात किती रशियन सैनिक मारले गेले याची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही.
पुतिन सरकारचे समर्थक असलेल्या कोमसोमोलिश्का प्रवदा यांनी सांगितले होते की, एप्रिल 2022 पर्यंत 10,000 रशियन सैनिक युद्धात मरण पावले होते. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर काही तासांनी हटवण्यात आली. यामागे सरकारचा दबाव असल्याचे सांगण्यात आले.
डेप्युटी कमांडर ठार
रशियन सैन्याने सांगितले की, युक्रेनने डोनेत्स्कमधील माकीव्हका भागातील एका शाळेवर 6 मैलांवरून हल्ला केला. आमचे सैनिक येथे उपस्थित होते. या हल्ल्यात डेप्युटी कमांडर लेफ्टनंट कर्नल बाचुरिन शहीद झाले. अनेक रशियन कमांडर युद्धात मरण पावले आहेत. युद्धाच्या 34 व्या दिवशी म्हणजे मार्च 2022 मध्ये, युक्रेनने दावा केला की 7 रशियन कमांडर मारले गेले आहेत.
पुतिन-झेलेन्स्की यांच्यात शब्दयुद्ध
नवीन वर्षाच्या दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध झाले. दोघांनी आपापल्या देशाला संबोधित केले. पुतिन यांनी 9 मिनिटांच्या भाषणात म्हटले की, आपले सैन्य आपल्या भूमी, सत्य आणि न्यायासाठी लढत आहे. रशिया आणि कुटुंबासाठी लढाई जिंकू.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देखील एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी रशियाच्या लोकांना सांगितले की, पुतिन त्यांचा नाश करत आहेत. ते आपल्या सैनिकांचे नेतृत्व करत नसून त्यांच्या मागे लपत आहे.
85% युक्रेनियन नागरिकांना रशियन कब्जा नको
कीव इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशियोलॉजीच्या सर्वेक्षणानुसार, 85% युक्रेनियन नागरिक रशियाला त्यांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा कब्जा करू इच्छित नाहीत. हे सर्वेक्षण 4 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान ज्या भागात रशियाचा कब्जा नाही, अशा भागात करण्यात आला. कीव इंडिपेंडंटच्या मते, शांतता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेनने रशियाला शरणागती पत्करावी, असे केवळ 8% लोकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.