आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात हाेळी उत्सव:74 मीटर उंचीच्या महालाचे दहन करून काेराेनाला निराेप

माॅस्काेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात रविवारी १०२ वर्षांची परंपरा असलेल्या मास्लेनित्सा उत्सव साजरा झाला. लाेकांनी ७८ फूट उंच लाकडी घराचे दहन करून मिठाईचे वाटप केले आणि परस्परांना शुभेच्छाही दिल्या. या पारंपरिक उत्सवाद्वारे वसंताचे आगमन, कुटुंबातील जिव्हाळ्यात वाढ व्हावी, दुष्प्रवृत्तींचा नाश हाेताे, याचे प्रतिक म्हणून हा उत्सव साजरा केला जाताे. भारतातील हाेळीच्या दहनाशी या उत्सवाचे साधर्म्य दिसून येते. उत्सवाच्या निमित्त लाेक जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाेबत घालवतात. पूर्वजांचे स्मरण करतात. मेळ्याचा आनंद लुटतात. याप्रसंगी जुन्या वस्तूंचेही दहन केले जाते. त्याला नवीन सुरुवात व पापक्षालनाचे प्रतीक मानले जाते. यंदाची संकल्पना ‘फेअरवेल आॅफ काेराेना’ अशी हाेती. दुष्ट शक्ती जळून खाक करणे आणि पुढची वाटचाल सुरू राहावी, अशा सदिच्छा दिल्या जातात. लाेकांनी यंदा लाकडाच्या महालास मास्कने सजवले हाेते.

५० हून जास्त देशांत हाेळीचा उत्सव
जगातील ५० हून जास्त देशांत भारतासारख्या हाेळीचा उत्सव साजरा केला जाताे. ब्रिटनचा बाेन फायर फेस्ट, स्पेनचा मर्क, अमेरिकेचा बर्निंग मॅन, जपानचा वाकाकुसा यामायाकी किंवा माउंटेन बर्निंग फेस्ट, ग्वाटेमालाचा क्वेमा डेल डियाब्लाे इत्यादी उत्सवाचा समावेश हाेताे.

बातम्या आणखी आहेत...