आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज युद्धनौका मैदानात:हिंदी महासागरातून जाणार; पुतीन म्हणाले - ताकदवान शस्त्र बाह्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवेल

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने बुधवारी अटलांटिक महासागरात एक हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणारी गोर्शकोव्ह युद्धनौका पाठवली आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना स्पष्ट संदेश दिला आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू व युद्धनौकेच्या कमांडरांसोबत केलेल्या एका व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे ही माहिती दिली. पुतीन म्हणाले, 'युद्धनौकेत झिरकॉन हायपरसॉनिक शस्त्र फिट करण्यात आलेत. हे शक्तिशाली शस्त्र बाह्य धोक्यांपासून रशियाचे संरक्षण करेल असा मला विश्वास आहे'

मिलिट्री डॉट कॉमच्या माहितीनुसार, रशियाच्या झिरकॉन क्षेपणास्त्रांचा रडारच्या मदतीने माग काढणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.
मिलिट्री डॉट कॉमच्या माहितीनुसार, रशियाच्या झिरकॉन क्षेपणास्त्रांचा रडारच्या मदतीने माग काढणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.

हिंदी महासागरातून जाणार 'गोर्शकोव्ह'

रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी सांगितले की, गोर्शकोव्ह अटलांटिक महासागरानंतर हिंदी महासागर व भूमध्य समुद्रातून मार्गकर्मण करेल.

रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगमध्ये संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू व युद्धनौकेच्या कमांडरांसोबत.
रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगमध्ये संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू व युद्धनौकेच्या कमांडरांसोबत.

झिरकॉन क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य

  • समुद्र व जमिनीवर अचूक हल्ला करण्यास सक्षम.
  • हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कोणत्याही क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीला चकवा देऊ शकतो.
  • ते हवेच्या वेगाहून 9 पट जास्त वेगवान.
  • 1000 किलोमीटरचा पल्ला सहज गाठू शकते.
  • अमेरिकेच्या माहितीनुसार, रशियाचे हे क्षेपणास्त्र अशा पद्धतीने डिझाइ करण्यात आले आहे की, त्यातून अण्वस्त्रेही सहजपणे नेता येतात.

झिरकॉन क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी अनेक देश शर्यतीत

रशियासह चीन व अमेरिकाही अशा प्रकारचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार करण्याच्या शर्यतीत आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया व जपानही हे क्षेपणास्त्र तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

रशिया सातत्याने अमेरिकेची क्षेपणास्त्र यंत्रणा भेदण्यासाठी आपल्या शस्त्रास्त्रांत सुधारणा करत आहे. पुतीन यांच्या मते, अमेरिका त्यांच्या क्षेपणास्त्रांवर हल्ला करू शकते. त्यामुळे रशियाला कायम सावध राहण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...