आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनवर रशियाचे हल्ले ३७७ व्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, सामरिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमुटमध्ये अनेक दिवसांच्या भीषण लढाईनंतर रशियन सैन्य आता विजयाच्या जवळ पोहोचले आहे. रशिया लवकरच बाखमुटच्या ताब्याचा दावा करत आहे. दुसरीकडे, युक्रेनचे सैन्य अजूनही शहर वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, रशियन सैन्याने बाखमुटमध्ये युक्रेनच्या सैन्याला वेढा घातला असून त्यांचे मार्ग बंद केले आहेत. पण त्यांची अडचण अशी आहे की, रशियन सैन्याचा दारूगोळाही संपला आहे. त्यामुळेच आता एकहाती लढत होत आहे.
डोनेस्तकमध्ये अडकून पडले रशियाचे सैनिक रशियन गोळीबाराने डोनेस्तक प्रदेशातील शहर आणि आसपासच्या गावांना लक्ष्य केले. बाखमुटचा प्रतिकार नष्ट करण्यासाठी मॉस्कोने त्रि-पक्षीय हल्ला केला. चाशिवयार आणि कोस्टिनाट्विका या जवळच्या शहरांतही प्रचंड गाेळीबार झाला. त्यामुळे अनेक गाड्या आणि घरांचे नुकसान झाले आणि आगी लागल्या. रशियन सैन्याने बाखमुटला जोडणारे अनेक रस्ते आणि पूलही नष्ट केले आहेत. युक्रेनियन पोलिस आणि स्वयंसेवकांनी सीमावर्ती भागातील लोकांना साेडणवण्याचे एक कठीणआव्हान पार पाडलेआहे. युक्रेन सेनेप्रमाणेचआता रशियन सैन्याकडेही शस्त्रे मर्यादितआहेत. बाखमुट मधून नागरिकांना युक्रेन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करतआहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.