आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतच्या युद्धात कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. अलीकडेच लीक झालेल्या काही कागदपत्रांनुसार पुतिन आपल्या 50 हजार सैनिकांचा बळी देण्यासही तयार आहेत. रशिया देशात वैद्यकीय आणीबाणी लागू करण्याचा विचार करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. याअंतर्गत आपत्कालीन सेवेसाठी देशभरातील डॉक्टरांना तैनात केले जाणार आहे.
वृत्तसंस्था मिररने गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हे युद्ध जिंकणे पुतिन यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्यास त्यांची हरकत नाही. ITV पत्रकार एम्मा बुरोज यांनी रशियाच्या उप-आरोग्य मंत्र्यांनी स्वाक्षरी केलेला एक दस्तऐवज ट्विट करून पुतिन यांच्या योजनेची माहिती दिली आहे. एम्मा बुरोज यांनी रशियन भाषेत लिहिलेल्या या संपूर्ण दस्तऐवजाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.
आरोग्य मंत्रालयाने मागवली वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती
या दस्तऐवजात, आरोग्य संस्थांना रशियन लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आणि त्यांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. दस्तऐवजात असेही नमूद केले आहे की सरकारला ट्रॉमा, हृदय, बालरोग शल्यचिकित्सक, ऍनेस्थेटिक्स, रेडिओलॉजिस्ट, परिचारिका आणि संसर्गजन्य रोगांचे विशेषज्ज्ञ आवश्यक आहेत.
25 फेब्रुवारी रोजी, रशियन आरोग्य मंत्रालयाने रशियन वैद्यकीय संस्थांना वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय कर्मचार्यांची नावे, कामाची ठिकाणे, पदे आणि संपर्क तपशील उप आरोग्य मंत्र्यांना पाठविण्याचे आदेश दिले.
डॉक्टरांना प्रवास आणि राहण्याची सोय
हे डॉक्टर कुठेही पाठवता येतील, असेही या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना प्रवास आणि निवासासाठी पैसे दिले जातील. फेडरल सेंटर फॉर मेडिकल डिझास्टरद्वारे यासाठी पैसे देणे अपेक्षित आहे.
रासायनिक शस्त्रे देखील वापरू शकतो रशिया
शस्त्र तज्ज्ञ हमिश डी ब्रेटन-गॉर्डन यांनी मिररला सांगितले की, रशियाला कुठेही पराभवाची भीती वाटत असल्यास ते रासायनिक शस्त्रेही वापरु शकता.
युक्रेनच्या एका लष्करी अधिकाऱ्याने आयटीव्हीला सांगितले की, दस्तऐवजात असे दिसून आले आहे की रशियाला युक्रेनकडून अशा प्रकारच्या सूडाची अपेक्षा नव्हती. युक्रेनियन लष्कराच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 3,000 रशियन सैनिकांना ठार केले आहे आणि 200 जणांना अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.