आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Made First Corona Vaccine; President Putin's Announcement That The First Vaccine Gave To His Daughter

कोरोनावर लस:जगातील पहिले कोरोना व्हॅक्सीन रशियाकडून तयार; पुतिन यांनी आपल्याच मुलीला पहिले डोस देत केली अधिकृत घोषणा

मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी माझ्या दोन मुलींपैकी एकीला प्रथम लस दिली आहे आणि तिला बरे वाटले -पुतिन

जगातील सर्व देश मागे टाकत रशियाने कोरोना व्हायरसची लस बनवण्यात बाजी मारली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली. ते म्हणाले की, 'आम्ही कोरोनाची सुरक्षित लस बनविली आहे आणि देशात त्यांची नोंद देखील झाली आहे. मी माझ्या दोन मुलींपैकी एकीला प्रथम लस दिली आहे आणि तिला बरे वाटले आहे.'

रशियन अधिकाऱ्यांनुसार, Gam-Covid-Vac नावाच्या या लसीला निश्चित योजनेनुसार रशियन आरोग्य आणि नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. ही लस वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि जोखीम असलेल्या लोकांना दिली जाईल असे सांगितले जात आहे.

रशियाने एक महिन्यापूर्वीच हे सांगितले होते

एका महिन्यापूर्वी, रशियाने संकेत दिले होते की त्यांची लस चाचणीत आघाडीवर आहे आणि ते याची 10 आणि 12 ऑगस्ट दरम्यान नोंदणी करतील. दरम्यान या लसीबाबत अमेरिका आणि ब्रिटनला रशियावर विश्वास नाही. रशियावर वॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा आरोपही लावण्यात येत आहे.

सप्टेंबरमध्ये उत्पादन. ऑक्टोबरपासून वितरण सुरू होईल

जगातील ही पहिली लस संरक्षण मंत्रालय आणि गमलय नॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी तयार केली आहे. सप्टेंबरमध्ये याचे उत्पादन करण्याची आणि ऑक्टोबरपासून लोकांना देण्याची तयारी सुरू झाली आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले - सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या

रशियन वृत्तसंस्था तास नुसार, मंगळवारी देशाच्या उच्च अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत अध्यक्ष पुतीन म्हणाले की, 'माझ्या माहितीनुसार, आज सकाळी जगात पहिल्यांदाच कोरोनोव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी एक लस नोंदविली गेली आहे.' पुतीन यांनी आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. मुराशको म्हणाले, 'मला माहिती देण्यात आली आहे की आमची लस प्रभावीपणे कार्य करते आणि चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करते. मी पुन्हा सांगतो की यासाठी सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.'

बातम्या आणखी आहेत...