आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुतिन यांना पार्किंसन्स:68 वर्षीय रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पद सोडणार, गर्लफ्रेंड आणि मुलींचा त्यांच्यावर दबाव

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पुढच्या वर्षीय रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 68 वर्षीय पुतिन यांना पार्किन्स आजार झाला आहे. त्यांची गर्लफ्रेंड एलिना काबाऐवा आणि मुली त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव टाकत आहेत. पुतिन 1999 पासून सत्तेत आहेत. यादरम्यान ते एकदा पंतप्रधानही राहिले आहेत. परंतू, नंतर संविधान संशोधन करुन परत सत्तेत आले.

कुटुंबाचा दबाव

पुतिन आणि त्यांच्या आजाराबाबतचा दाबा ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’ ने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. वृत्तपत्रासोबतच्या बातचीतमध्ये रशियातील पॉलिटिकल अॅनालिस्ट वेलेरी सोलोवेई म्हणाले की, पुतिन यांच्यावर राजीनामा देण्याचा त्यांची 37 वर्षीय गर्लफ्रेंड आणि दोन मुलींचा दबाव आहे. येत्या जानेवारीमध्ये पद सोडण्याची घोषणा करू शकतात.

आजारपणामुळे पद सोडणार

वेलेरी पुढे म्हणाल्या की, पुतिन यांना पार्किंसन्स आजार झाल्याची शक्यता आहे. काही काळापासून त्यांच्यात त्या आजाराची लक्षणे दिसत आहेत. मीडियाने त्यांच्या काही व्हिडिओ फुटेजचे अॅनालिसिसदेखील केले आहेत. यात स्पष्टपणे दिसत आहे की, पुतिन यांच्या हाताची आणि पायांची बोटे थरथरत आहेत.

नवीन कायद्याची टायमिंग महत्वाची

पुतिन यांच्या पद सोडण्याची टायमिंग विशेष लक्ष देण्यासारखी आहे. रशियाच्या संसदेत एक नवीन कायदा आणण्याबाबत विचार सुरू आहे. हा कायदा आल्यास पुतिन निवांत होतील. या कायद्यानुसार, कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षांवर कधीच कोणता गुन्हा दाखल केला जाऊ शकणार नाही. पुतिन यांच्यावर अनेक आरोप लागलेले आहेत. हा नवीन कायदा आल्यास पुतिन येणाऱ्या काळात कायद्याच्या कचाट्यात सापडू शकणार नाहीत.

काय आहे पार्किंसन्स?

एका आकडेवारीनुसार, जगभरात 62 लाख लोकांना हा आजार झाला आहे. दरवर्षी या आजारामुळे एक लाख लोकांचा मृत्यू होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात थरथराट आणि कठोरता येते. यात रुग्णाला शरीराची हालचाल करण्यात अडचण येते. या आजाराचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो.