आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia School Attack: Dozens Killed In Russia School Firing, 2 Attackers Killed Latest News And Updates In Russia School Attack

रशियात शाळेवर हल्ला:शाळेवर बेछूट गोळीबारात 13 जणांचा मृत्यू, अनेकांना ओलीस ठेवले; पोलिसांकडून दोन हल्लेखोरांचा खात्मा

मॉस्को2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियातील कझान शहरात मंगळवारी एका शाळेत घुसून गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 चिमुकल्यांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून दोन चिमुकल्यांनी उडी घेतली. त्यामुळे, त्यांचा मृत्यू झाला.

रशियातील वृत्तसंस्थेने जारी केलेल्या माहितीप्रमाणे, शाळेच्या चौथ्या मजल्यावर हल्लेखोरांनी काहींना ओलीस ठेवले आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्या 12 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रशियातील स्थानिक माध्यमांवर हल्ल्याचे भीषण चित्र दाखवण्यात आले. त्यामध्ये शाळेत स्फोट झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सोबतच, घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा रक्षकांनी 2 हल्लेखोरांना ठार मारले आहे. ठार मारण्यात आलेल्या हल्लेखोरातील एकाचे वय अवघे 19 वर्षे आहे.

सोबतच, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली बंदूक त्याच्याच नावे नोंदणी केली होती. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर पोलिसांनी एका 17 वर्षांच्या संशयिताला सुद्धा ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...