आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन विद्यापीठात गोळीबार:​​​​​​​पर्म विद्यापीठात परिसरात विद्यार्थ्याकडून गोळीबार, 8 ठार; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या

मॉस्को2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हल्लेखोर तैमूर प्रवेशद्वारामधून आत जात असताना त्याची रायफल भरत होता.

रशियातील पर्म विद्यापीठात सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुरक्षा दलांकडून शुटरला ठार करण्यात आले असून हल्लेखोराची ओळख तैमुर बेकमनसुरोव या नावाने पटली आहे.

मात्र, हल्लेखोराचा गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता. हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारादरम्यान, काही विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी हल्लेखोराला शाळेत प्रवेश करताना पाहिले होते. परंतु, त्याने गोळीबार सुरू करताच विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारायला सुरुवात केली.
विद्यार्थ्यांनी हल्लेखोराला शाळेत प्रवेश करताना पाहिले होते. परंतु, त्याने गोळीबार सुरू करताच विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारायला सुरुवात केली.

पर्म विद्यापीठ मॉस्कोपासून 1,300 किलोमीटर अंतरावर आहे. हल्लेखोर पर्म विद्यापीठाचा विद्यार्थी असून रशियन तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचे गंभीर वर्णन केले आहे. विशेष म्हणजे रशियामध्ये शस्त्रे खरेदी करणे सहसा सोपे नाही. परंतु, शिकार किंवा क्रीडा खेळाडूंना ही शस्त्रे खरेदी करता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...