आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचा सर्वात सक्रीय ज्वालामुखीचा मंगळवारी 16 वर्षांनंतर उद्रेक झाला. शिवेल्चु नामक या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे आकाशात 20 किमी उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले. यामुळे रशियाच्या कामाच्का द्वीपकल्पात बराच काळ हवाई वाहतूक बंद ठेवावी लागली.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ज्वालामुखीच्या स्फोटामुळे बाहेर पडलेली राख पश्चिमेस 400 किमी, तर दक्षिणेत 270 किमीपर्यंत पसरली आहे. ती अजूनही पसरत आहे. ज्वालामुखीच्या या उद्रेकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
10 हजार वर्षांत अवघ्या 60 वेळा उद्रेक
ज्वालामुखीपासून बचाव करण्यापासून स्थानिक प्रशासनाने 6 हजार किमीच्या परिघातील सर्वच शाळा बंद केल्या आहेत. नागरिकांना घरांतच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रशियन अकादमी ऑफ सायंसच्या वृत्तानुसार, या ज्वालामुखीचा गत 10 हजार वर्षांत केवळ 60 वेळाच उद्रेक झाला आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेक झालेल्या परिसरात 8.5 इंच जाड राखेचा थर जमला आहे. मंगळवारपूर्वी हा ज्वालामुखी 2007 मध्ये फुटला होता. हा ज्वालामुखी ज्या डोंगरावर आहे, त्याची उंची 2800 मीटर आहे.
रशियात उद्रेक झालेल्या ज्वालामुखीचे फोटो...
ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रक्रिया वर्षभरापूर्वीच सुरू
कामाच्का जिओफिजीकल सर्व्हेच्या संचालकांनी सांगितले की, या ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रक्रिया वर्षभरापूर्वी सुरू झाली होती. ती आता काहीशी शांत झाली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, या उद्रेकामुळे 6800 किलोपर्यंतच्या भागातील नागरिकांना घरांतच राहण्याचे निर्देश देण्यात आले. आसपासच्या भागातील वीज पुरवठाही बंद करण्यात आला आहे.
ज्वालामुखी म्हणजे काय?
ज्वालामुखीच्या ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी नैसर्गिक विवरे आहेत. त्यातून पृथ्वीच्या गाभ्यात वितळेले मॅग्मा, लाव्हा, राख आदींसारखे पदार्थ स्फोटासह बाहेर पडतात. ज्वालामुखी पृथ्वीच्या 7 टेक्टोनिक प्लेट्स व 28 सब-टेक्टोनिक प्लेट्सच्या धडकेमुळे तयार होतात. इटलीतील माउंट एटना जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.