आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukrain Waar | Marathi News | Putin | USA | If Anyone Interferes In The Russia Ukraine Conflict, It Will Have Dire Consequences Putin

अमेरिका-नाटोला पुतिनची धमकी:रशिया आणि युक्रेनच्या वादात कुणी हस्तक्षेप केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील; व्लादिमीर पुतिन यांनी धमकावले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. तसेच राष्ट्रीय माध्यमातून जनतेशी आणि जगाशी संवाद साधला. युक्रेनवर विशेष लष्करी हल्ले सुरू आहेत. याचा हेतू युक्रेन काबिज करणे किंवा नागरिकांना लक्ष्य करणे मुळीच नाही. युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्र टाकावे. यासोबतच युक्रेन आणि रशियाच्या मुद्द्यात कुणी हस्तक्षेप करत असेल तर त्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे व्लादिमीर पुतिन यांनी धमकावले आहे.

सीएनएन रिपोर्टने दिलेल्या वृत्तानूसार, पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा करताच राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातूनही हल्ले सुरूच आहेत.

पुतिन यांचे विधान, सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी

1. पुतिन यांनी टेलिव्हिजनवरील आज सकाळी दिलेल्या भाषणात म्हटले आहे की, युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रसंधी करावी. युक्रेनच्याच सैनिकांनी रशियाला चिथावणी दिली आणि या सर्व गोष्टी निओ-नाझीवादी विचारसरणीच्या लोकांच्या इशाऱ्यावर होत आहेत. 2014 मध्ये युक्रेन येथे तयार झालेल्या फुटीरतावादी क्षेत्रांच्या सांगण्यावरून आम्ही हे पाऊल उचलत आहोत. त्यांनी आम्हाला मदत केली होती आता आम्ही त्यांची मदत करत आहोत.

2. नरसंहार सहन करणाऱ्या बंडखोरांचे संरक्षण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या 8 वर्षांपासून अत्याचार आणि नरसंहाराला बळी पडलेल्यांचे संरक्षण करत आहोत. त्यासाठी आम्ही युक्रेनमध्ये निःशस्त्रीकरणाचे पाऊल उचलणार आहोत. नरसंहार करणाऱ्यांना आम्ही कोर्टात खेचू. यामध्ये रशियन फेडरेशनमधील लोकांचाही समावेश आहे.

3. जर कोणी युक्रेन आणि रशिया वादामध्ये ढवळाढवळ करण्याचा किंवा आमच्या लोकांना किंवा देशाला धमकावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे परिणाम की ज्यांची कुणी कल्पनाही केली नसेल. आम्ही कुठलेही निर्णय घेण्यासाठी तयार आहोत. असे पुतिन यांनी ठणकावले.

राजधानी कीवच्या अनेक भागांत स्फोट
पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवच्या मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनूसार, रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. UNSC बैठकीच्या मध्यभागी पुतिन यांनी ही घोषणा केली. रशिया-युक्रेन तणावावरच ही बैठक सुरू आहे.

मानवतेचे नुकसान होईल- जो बायडेन

पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. बायडेन म्हणाले की, पुतिन यांच्या निर्णयाचे खूप वाईट परिणाम होतील. यामुळे सामान्य लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. या हल्ल्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागेल. या सर्व गोष्टींसाठी केवळ रशियाच जबाबदार राहील. अमेरिका आणि त्यांचे मित्र देश यावेळी एकवटले असून, या कारवाईला सडेतोड उत्तर देतील. जग रशियाला जबाबदार धरेल. असे बायडेन म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...