- Marathi News
- International
- Russia Ukrain Waar | Putin | Marathi News | Attacks On 13 Locations In Ukraine, Just 5 Minutes After Putin's Announcement, Ballistic Missile Attacks In The Capital Kiev
PHOTOS रशियाचा युक्रेनवर हल्ला:पुतिन यांच्या घोषणेच्या अवघ्या 5 मिनिटानंतर युक्रेनच्या 13 ठिकाणी हल्ले, राजधानी कीवमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला
खार्कीव येथे झालेल्या हल्ल्यात जखमी झालेली महिला..
रशियाने अखेर युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली आहे. आज सकाळी 9 वाजता (भारतीय वेळेनूसार) राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर सैनिकी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनमध्ये हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, रशियाने युक्रेनच्या 12 ठिकाणी हल्ले केले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये देखील दोन मोठे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले आहेत. फोटोजमध्ये पाहा...
रशियाने कीव शहराला क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. हल्ल्यानंतर युक्रेनचे पोलिस क्षेपणास्त्रांची तपासणी करत आहेत.
खार्किव शहराबाहेर हवाई हल्ल्यांमुळे मोठा विध्वंस झाला. आपल्या नातेवाईकाच्या मृत्यूबद्दल शोक करताना...
हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
हा फोटो युक्रेनची राजधानी कीवचा आहे. गुरुवारी सकाळी येथे स्फोट असून, युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने हा फोटो ट्विट केला आहे.
कीवमध्ये हल्लानंतर मेट्रोकडे जाताना नागरिक
रशियाने युक्रेनमधील 12 ठिकाणांना लक्ष्य केले.
फोटो ईशान्य युक्रेनमधील खार्किव शहराचा आहे. येथेही अनेक स्फोट झाले आहेत.
निप्रो शहरातही क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. एका यूजरने हा फोटो सोशल मीडियावर टाकला.
हल्ल्यानंतर कीव शहरात दहशत पसरली. लोक आपापल्या कारमधून शहराबाहेर जाताना दिसले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
हा फोटो युक्रेनच्या मारियुपोल शहराचा आहे. येथेही लोक घरे सोडताना दिसले. एक महिला तिच्या कुटुंबासह शहराबाहेर जात असताना.
पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क येथील स्वयेरोडोनेत्स्क येथील एटीएम मशीनबाहेर लोकांची गर्दी दिसून आली. लोक पैसे काढताना दिसत आहे.
युक्रेनच्या डोनेस्तक बाहेरील रस्त्यावर लष्करी वाहने दिसत आहेत.
आग्नेय युक्रेनमधील मारियुपोल येथे नागरिक कारमध्ये पेट्रोल भरताना