आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukrain Waar | RUSSIA UKRAINE CONFLICT | Marathi News | US President Warns Russia: "We Will Support An Attack On Ukraine."

रशिया-युक्रेन वाद:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला इशारा, म्हणाले- हल्ला केल्यास आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया आणि युक्रेन वाद चिघळतच चालला आहे. रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी सैनिकांनी घेरले आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान अमेरिकासह अनेक पश्चिम भागातील देश युक्रेनला सपोट करताना पाहायला मिळत आहे. रशियासोबत चर्चा करुन हा वाद मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र रशिया कोणचेही ऐकण्यास तयार नाही. दरम्यान आता अमेरिकेने रशियाला इशारा दिला आहे.

आम्हाला संघर्ष नकोय

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी रशियाला इशारा दिला आहे. जो बायडन युक्रेन प्रश्नावर रोजच नव-नवीन ट्विट करताना पाहायला मिळत आहे. बायडन यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटले आहे की, "आम्हाला संघर्ष नको आहे, परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला मदत करू. युक्रेनवर आक्रमण करणे हे चुकीचे असुन, विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया जबाबदार राहिल." असे जो बायडन यांनी म्हटले आहे.

युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी ट्विट करत लिहले आहे की, युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रशिया अशा प्रकारचे खेळ यापूर्वी देखील खेळला आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि आमचे सहयोगी युक्रेनच्या जनतेचे समर्थन करणार. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरू. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. असे बायडन म्हणाले.

चर्चा करुन उपाय काढू

बायडन पुढे म्हणाले की, युद्धाने काहीही होणार नाही. त्यामुळे आपण चर्चा करून या मुद्द्यावर उपाय काढू. सध्या रशियाकडे वेळ गेलेली नाही. त्यांनी चर्चेस होकार द्यावा. असे बायडन म्हणाले. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो. रशियाच्या सैन्याने युक्रेनला चारही बाजुंनी घेरले असून, रशिया पुढील काही दिवसात युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना आखत आहे. असे भाकित बायडन यांनी केले आहे.

युक्रेनला दिली जाईल मदत
जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर, युक्रेनला मदत केली जाण्याची घोषणा व्हाइट हाउसमध्ये करण्यात आली. युक्रेनसोबत असणारे देश युक्रेनला मदत करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...