आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनची राजधानी कीव्हमधील नागरिकांची सोमवारची सकाळ कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजांनी झाली. रशियाने इराणच्या आत्मघातकी ड्रोनद्वारे कीव्हवर हल्ला केला होता. रशियाचा उद्देश कीव्हच्या पॉवर स्टेशन व इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा होता.
युक्रेनच्या एअर डिफेन्सने 35 पैकी 30 ड्रोन पाडून रशियाचा हल्ला उधळवून लावला. हा मागील 7 दिवसांतील रशियाचा कीव्हवरील तिसरा मोठा हवाई हल्ला होता.
रशियाचा युक्रेनला अंधार व रक्त गोठवणाऱ्या थंडीत लोटण्याचा डाव
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांच्या माध्यमातून रशिया युक्रेनला अंधार व रक्त गोठवणाऱ्या थंडीत ढकलण्याचा डाव आहे. यामुळेच त्याने पायाभूत सोईसुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केलेत. आमचे अभियंते स्थिती रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत.
कीव्हचे मेयर व्हिटाली मलेत्स्की यांनी सांगितले की, या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जिवीतहाणी झाली नाही. तसेच कुणी जखमीही झाली नाही. कीव्हच्या आसपासच्या क्षेत्राचे गव्हर्नर ओलेक्सी कुलेबा म्हणाले की, या हल्ल्यात अनेक घरांचे नुकसान झाले. तर 2 जण जखमी झाले.
स्वस्त व वेगवान असतात सुसाइड ड्रोन
सुसाइड ड्रोन नष्ट होणारे मानवरहित एअरक्राफ्ट असतात. ते आकाराने लहान व स्वस्तही असतात. ते वेगाने आपल्या टार्गेटचा वेध घेतात. युक्रेनचे नागरिक त्यांचा मोपेड म्हणून उल्लेख करतात. युक्रेनचे लष्कर विमानविरोधी क्षेपणास्त्र व फायटर जेटच्या माध्यमातून या ड्रोन्सचा सामना करतात.
सेंट्रल व पूर्व भागात सर्वाधिक नुकसान
एका पॉवर ग्रिडचे संचालकाने ही स्थिती अत्यंत कठीण असल्याचा दावा केला. ते म्हणाले - देशाच्या मध्य व पूर्व भागाला या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कीव्ह शहर, खार्किव्ह, सुमी, पोलटावा व झेपसोरिजियासह अनेक भागांतील वीज पुरवठा आपत्कालीन स्थितीत बंद करण्यात आला आहे.
हल्ल्याचा साक्षीदार असणाऱ्या एका व्यक्तीने रॉयटर्सला सांगितले की, त्यांनी एका ऊर्जा केंद्रात आग भडकल्याचे पाहिले. एका रुग्णालायच्या गार्डने सांगितले की, मी एक स्फोट ऐकला. पुढील 3 ते 4 मिनिटांत मी इतर स्फोटांचेही आवाज ऐकले.
शुक्रवारी डाकली होती 70 हून जास्त क्षेपणास्त्रे
रशियाने शुक्रवारी युक्रेनवर 70 हून जास्त क्षेपणास्त्र डागले होते. हा रशियाचा सर्वात मोठा हल्ला होता. त्यानंतर युक्रेनच्या दुसऱ्या मोठ्या शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच देशभरात आपत्कालीन ब्लॅकआउट घोषित करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.