आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्ष जुन्या रशियन गॅस लाईनमध्ये स्फोट:तीन जण ठार; ही पाईपलाईन युक्रेनमार्गे युरोपातील अनेक देशांना गॅस पुरवठा करते

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या पश्चिम कझान भागात मंगळवारी 42 वर्षे जुन्या गॅस पाइपलाइनचा स्फोट झाला. ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. रशियाची ही पाइपलाइन युक्रेनमार्गे युरोपातील अनेक देशांना गॅस पुरवठा करते. या घटनेची पुष्टी करताना आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्तीचे काम करत असताना कालिनिनो गावाजवळ अचानक हा स्फोट झाला.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे लागलेली आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. पश्चिम युरोपातील ऊर्जा पुरवठ्यासाठी ही गॅस पाइपलाइन अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जे युक्रेनमधील सुदजा पॉईंटपासून आत जाते. रशियापासून युरोपला वायू वाहतूक करण्यासाठी सध्या हा मुख्य मार्ग आहे.

पश्चिम युरोप अजूनही थंडीच्या कडाक्यात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणल्यास त्याचा लोकांवर खोल परिणाम होईल.
पश्चिम युरोप अजूनही थंडीच्या कडाक्यात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणल्यास त्याचा लोकांवर खोल परिणाम होईल.

पाइपलाइन 1980 मध्ये बांधण्यात आली
ही पाइपलाइन 1980 मध्ये रशियाच्या कझान भागात बांधण्यात आली. जी पश्चिम युरोपला गॅस पुरवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. गॅस पुरवठा कंपनी गॅझप्रॉमने अद्याप या स्फोटावर प्रतिक्रिया दिलेली नाही. गॅझप्रॉमने आज सांगितले की, युक्रेनमधून युरोपला होणारा गॅस पुरवठा 43 दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...