आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षाचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वीच रशियाने युक्रेनवर ड्रोनने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये युक्रेनची राजधानी कीवमधील पायाभूत सुविधांना टारगेट केले जात आहे. राज्यपाल ओलेक्सी कल्यूबा यांनी टेलिग्रामवर रशियन हल्ल्यांची माहिती दिली. हल्ल्यांमुळे डेस्निआन्सकी जिल्ह्यात इमारतीचा ढिगारा पडून एका 19 वर्षांचा मुलगा जखमी झाला.
त्याचवेळी बीबीसीच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डोनटेस्क भागात 400 रशियन सैनिकांना ठार केले. रशियानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र, आपले किती सैनिक मारले गेले हे त्यांनी सांगितलेले नाही.
सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून कीवमध्ये सायरन ऐकायला येत आहेत. कीवमध्ये रशियन हल्ल्याचा इशारा देण्यासाठी हवाई हल्ल्याचे सायरन सतत 4 तास वाजवले जात आहेत. राज्यपाल ओलेक्सी कालुबा यांनी लोकांना निवासस्थानात राहण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनचे हवाई संरक्षण हे हल्ले रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेन रशियन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देतोय
अल्जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनने पहाटे 3 वाजल्यापासून कीवच्या आकाशात घिरट्या घालणाऱ्या 20 संशयास्पद वस्तू नष्ट केल्या आहेत. रशियाने पाठवलेले ते शहीद ड्रोन असावेत, अशी भीती व्यक्त केली जात होती. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने रविवारी रात्री रशियाकडून पाठविण्यात आलेले 45 इराणी ड्रोन नष्ट केले आहे.
पुतिन-झेलेन्स्कीत नवीन वर्षावर शब्दयुद्ध झाले
नववर्षाच्या दिवशीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध झाले. नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघांनी आपापल्या देशाला संबोधित केले. पुतिन यांनी 9 मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात सांगितले की, आमचे सैन्य मातृभूमी, सत्य आणि न्यायासाठी लढत आहे. आम्ही युद्ध जिंकू, रशियासाठी, आमच्या कुटुंबांसाठी. त्याचवेळी, बदला म्हणून, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये झेलेन्स्की यांनी रशियातील लोकांना पुतिन त्यांचा नाश करत असल्याचे सांगितले आहे. पुतीन आपल्या सैन्याचे रक्षण करत नसून त्यांच्यामागे लपत आहे.
सरत्या वर्षातही युक्रेनमधील युद्ध थांबले नाही
2022 च्या अखेरीस रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देश स्फोटांच्या आवाजाने गुंजला. या हल्ल्यांमध्ये युक्रेनची राजधानी कीवमध्ये 1 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत असलेल्या युक्रेनवासियांना हा मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन दिवसांत रशियाने युक्रेनवर केलेला हा दुसरा मोठा क्षेपणास्त्र हल्ला मानला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.