आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine Tension Putin Declares Donetsk Lugansk An Independent State, Sends Troops | Marathi News

युक्रेनमध्ये तणाव वाढला:आता रणगाड्यांसह लुहान्स्क, डोनेत्स्कमध्ये घुसले रशियन सैनिक, काही तासांपूर्वीच झाली होती दोन्ही देश स्वतंत्र झाल्याची घोषणा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क (डॉनबॉस क्षेत्र) या दोन प्रांतात प्रवेश केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 13 तासांपूर्वी (भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता) युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे या भागांकडे सरकत आहेत. लुहान्स्क-डोनेत्स्क आणि फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील भागात शांतता राखणे आवश्यक असल्याचे पुतीन म्हणाले होते.

आम्ही घाबरत नाही - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियाने उचललेल्या पावलांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही कोणाकडून काही घेतले नाही आणि कोणाला काही देणार नाही. रशियाच्या घोषणा आणि धमक्यांना न जुमानता युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय सीमा पूर्वीप्रमाणेच राहतील, असे जेलेन्स्की म्हणाले. युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित करण्याच्या पुतिनच्या हालचालीनंतरच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावली आहे.

तातडीच्या बैठकीत भारताने रशियाच्या या कारवाईवर चिंता व्यक्त केली. UNSC मधील भारताचे प्रतिनिधी TS तिरुमूर्ती म्हणाले - या पाऊलामुळे शांतता आणि सुरक्षिततेचा भंग होऊ शकतो. हा प्रश्न राजनैतिक वाटाघाटीतूनच सोडवला जाऊ शकतो. दुसरीकडे, रशियाचे हे पाऊल युक्रेनमध्ये घुसखोरीचे निमित्त असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आम्ही आणि आमचे मित्र यावर सहमत आहोत की, रशियाने अधिक घुसखोरी केल्यास त्याला त्वरीत आणि योग्य उत्तर देण्यात यावे. ही अशी वेळ आहे जेव्हा कोणी किनाऱ्यावर उभे राहून शांतपणे पाहू शकत नाही.

अपडेट्स
रशिया शांतता चर्चा उध्वस्त करत आहे

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी रशियावर शांतता चर्चा उधळल्याचा आरोप केला. मंगळवारी सकाळी देशाला संबोधित करताना त्यांनी आपल्या प्रादेशिक क्षेत्रांबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. जेलेन्स्की यांनी यापूर्वी रशियाला ‘आम्ही घाबरत नाही’ असे स्पष्टपणे सांगितले होते. युक्रेनला अजूनही पाश्चात्य देशांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.

अमेरिका आणि ब्रिटन रशियाविरुद्ध कारवाई करणार

रशियाच्या या निर्णयावर अमेरिकेनेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, अध्यक्ष जो बायडेन लवकरच अमेरिकन नागरिकांना लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रदेशात गुंतवणूक करण्यापासून रोखणारा आदेश जारी करतील. अमेरिकेशिवाय ईयू आणि ब्रिटनही निर्बंध लादण्याबाबत बोलत आहेत. याशिवाय बायडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी युनायटेड स्टेट्सने आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...