आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेन युद्धाच्या तोंडावर उभे आहेत. रशियाने बुधवारी युक्रेन सीमेवर १०० नवी लष्करी वाहने तैनात केली. तसेच सैनिकांच्या उपचारासाठी तात्पुरते रुग्णालयही उभारले. मेक्सेर या अमेरिकी कंपनीद्वारे २२ फेब्रुवारीला जारी नव्या सॅटेलाइट इमेजमध्ये त्याला दुजोरा मिळाला. एका अहवालानुसार, युक्रेन सीमेपासून २० किमी अंतरावर रशियाने ५५० वर तंबू उभारले आहेत. दुसरीकडे, रशिया समर्थक फुटीरवाद्यांच्या हल्ल्यात एक सैनिक शहीद झाला आणि ६ जखमी झाले, असा दावा युक्रेनने केला. अशा स्थितीत अमेरिका, युरोपियन युनियन, जर्मनी, ब्रिटन, जपान, युक्रेन, ऑस्ट्रेलियाने रशियाला युद्धापासून रोखण्यासाठी अनेक निर्बंध लावले आहेत, पण त्यामुळे रशियाला रोखणे अशक्य आहे. कोणते निर्बंध लावले, ते का परिणामकारक नाहीत, कोणते लावता आले असते आणि का लावले नाहीत, हे पाहू.
अमेरिकेत १९७० नंतर महागाई दर (७.५%) उच्च स्तरावर आहे. अशा वेळी अमेरिकेने रशियावर कडक निर्बंध लादल्यास त्यांच्यातील अब्जावधी डॉलरच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम होईल. बायडेन सरकारवरील लोकांचा रोष आणखी वाढला असता. कारण सीएनएन पोलनुसार प्रत्येक १० पैकी ७ जणांना वाटते की महागाईसाठी सरकारने योग्य पावले उचलली नाहीत.
यापूढे हतबल
हे शक्य असते
अमेरिकेला वाटले तर रशियाचे ज्या तंत्रज्ञानासाठी अमेरिकी कंपन्यांशी करार आहेत त्यावरही निर्बंध लादले असते.
परिणाम : या तंत्रज्ञानात विमान उडवणे व स्मार्टफोन चालवण्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो.
यूएस डॉलरमधील व्यवहार रोखू शकते.
परिणाम : आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी अमेरिकी डॉलरचा वापर सर्वाधिक होतो. अमेरिकी फायनान्शियल सिस्टिमद्वारे हे व्यवहार हाेतात. अमेरिकेने यावर बंदी आणल्यास डॉलर ट्रांझेक्शन प्रभावित होतील. तथापि, रशियाची एसएफएस सिस्टिम अशा परिस्थितीचा सामना करू शकते. {स्विफ्ट फायनान्शियलमधूनही रशियाला बाहेर करता आले असते. परिणाम : विदेशातून पैशांची व्यवहार क्षमता प्रभावित झाली असती. स्विफ्टद्वारे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे जातात. अमेरिकेने यावर बंदी आणल्यास डॉलरमधील ट्रांझेक्शन प्रभावित होतील.
हे केले
अमेरिका : रशियाच्या २ सरकारी बँकांना यूएस-युरोपात व्यापारावर बंदी.
परिणाम : रिटेल ऑपरेशनमुळे देणे-घेणे नाही. त्यामुळे जास्त परिणाम नाही.
जर्मनी : ११.६ अब्ज डॉलरची नॉर्ड स्ट्रीम २ गॅस योजना रोखली आहे.
परिणाम : बंदी तात्पुरती आहे. स्थिती सुधारताच ती पुन्हा सुरू होऊ शकते. ब्रिटन : ५ रशियन बँका आणि ३ रशियन अब्जाधीशांवर निर्बंध लावले. परिणाम : खूप मर्यादित परिणाम.
जपान : रशियन बाँडवर बंदीसह काही लोकांना देशात प्रवेशावर बंदी घातली.
युरोपियन युनियन (ईयू) : युक्रेनच्या २ प्रांतांना स्वतंत्र देश बनवण्याच्या बाजूने मत देणारे ३५१ राजकीय नेते व संरक्षण-बँकिंग क्षेत्रातील २७ रशियन अधिकाऱ्यांवर बंदी घातली.
युक्रेन : ३५१ नेत्यांना प्रवेश बंदी केली.
आॅस्ट्रेलिया : रशियन सुरक्षा परिषदेच्या ८ सदस्यांना देशात बंदी.
परिणाम : त्यांचा व्यापक प्रभाव नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.