आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Behind The Government; European People's Initiative To Help Ukraine, 1 Billion Rupees In 4 Days | Marathi News

ग्राउंड रिपोर्ट:सरकार मागे; युक्रेनच्या मदतीसाठी युरोपातील लोकांचा पुढाकार, 4 दिवसांत 1 अब्ज रुपये, अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव्हच्या रस्त्याच्या कडेला शिकोटी करून बसलेले युक्रेनचे सैनिक - Divya Marathi
कीव्हच्या रस्त्याच्या कडेला शिकोटी करून बसलेले युक्रेनचे सैनिक

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या मदतीसाठी शक्तिशाली युरोपीय देशांतील सरकारे मागे हटली आहेत. परंतु युरोपातील अनेक देशांतील सामान्य नागरिकांंनी मात्र युक्रेनला मदतीचा हात दिला आहे. नॅशनल बँक ऑफ युक्रेनने (एनबीयू) मदतीसाठी चार दिवसांपूर्वी एक विशेष खाते उघडले होते. एनबीयूच्या मल्टीकरन्सी अकाउंटमध्ये केवळ चार दिवसांत एक अब्ज रुपयांहून जास्त रक्कम जमा झाली आहे. सैन्य यातून आता दारूगोळा, वाहतूक साधने, टेहळणी यंत्रे, वर्दी, भोजन गोळा करू लागले आहे. युक्रेनसाठी जमा केली जाणारी मदत राजदूत कार्यालयांमार्फत युक्रेन सैन्यापर्यंत पोहोचवली जात आहे. झेक रिपब्लिकनमध्ये दोन ठिकाणी अशा प्रकारची सामग्री एकत्रित केली जात आहे.

रशियाला निर्बंधाचा फटका
- रशिया ऑनलाइन बँकिंग पेमेंट म्हणजे स्विफ्टचा वापर करणारा दुसरा मोठा देश
- सर्व रशियन बँकांवर स्विफ्ट अंतर्गत निर्बंध लागू झाल्यास चीन सिप्स सिस्टिमचा पर्याय आहे.
- सोबतच पूर्ण निर्बंध लागल्यास रशियाकडे क्रिप्टोकरन्सी व डिजिटल रुबलचाही मार्ग आहे.
- परदेशी चलनासाठी अडचणी. रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसेल.

दुबई एक्स्पो : रशियाचा आवाज; युक्रेनच्या दालनात शांतता
दुबई एक्स्पोमधील रशिया व युक्रेनच्या दालनांत वेगवेगळे वातावरण पाहायला मिळाले. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनच्या तंबूत घबराट, चिंता स्पष्ट जाणवू लागली आहे. रंगीबेरंगी उडत्या तबकडीसारखी सजावट असलेल्या रशियाच्या दालनात मात्र मोठ्या आवाजातील संगीताच्या ठेक्यावर रशियाच्या विकासाविषयी बोलले जात आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचे दावे केले जात आहेत. भव्य हॉलमध्ये विशालकाय मानवी मेंदूवर प्रोजेक्शनच्या साहाय्याने भविष्यात परस्परांशी जोडले जाणे, सहकार्य करणे, सामंजस्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून सांगितले जात आहे. युक्रेनच्या दालनात मात्र शांतता पसरली आहे. ना संगीत, ना फॅशन-मनोरंजन. स्क्रीनवर पुढील शब्द आहेत -‘युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे या’. वास्तविक युक्रेनच्या दालनाची यंदाची संकल्पना ‘स्मार्ट लाइफ थिंकिंग..फिलिग’ अशी आहे. युक्रेनच्या दालनातील बहुतांश स्क्रीन अंधारात बुडाल्या आहेत. संकल्पना समजावून सांगणारा कुणीही नाही.

पॅव्हेलियनच्या कार्यकारी मारथा म्हणाल्या, माझ्या घरावर हल्ला झाला. तुमचे घर हल्ला झालेल्या क्षेत्रात आहे का? यावर मारथा म्हणाल्या, नाही. परंतु त्याचा काय संबंध ? संपूर्ण युक्रेन माझे घर आहे. रेस्तराँ संचालक गेरेसिमच्या पत्नी मूळच्या राजधानी कीव्हच्या नागरिक आहेत. गेरेसिम ३१ मार्चपर्यंत आपले काम करू इच्छितात. नंतर बल्गेरिया, पाेलंडमार्गे आपल्या घरी परतू इच्छितात. सर्व देशांप्रमाणेच यूएईचे एअर अरेबिया, फ्लाय दुबई, विज्र एअर इत्यादी कंपन्यांनीदेखील युक्रेनसाठीची सेवा रद्द केली आहे.

बातम्या आणखी आहेत...