आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत तटस्थ राहिलेल्या इस्रायलने युक्रेनला विशेष क्षेपाणस्त्ररोधी प्रणाली देण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीमुळे युक्रेनियन नागरिाकांचे प्राण वाचवले जाऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे या प्रणालीची अद्ययावत आवृत्ती इस्रायलमध्ये तैनात करण्याच्या आधी युक्रेनला दिली जाणार आहे.
इस्रायलमधील युक्रेनचे राजदूत येवझेन कोर्निचुक यांच्यानुसार, कीव्हमध्ये इस्रायली क्षेपणास्त्ररोधी प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. येत्या काही दिवसांतच युक्रेनच्या महत्वाच्या शहरांत याची स्थापना केली जाईल.
काय फायदा होणार
येवझेन म्हणाले की, ही सर्वोत्तम क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायलने तयार केली आहे. याची सर्वात आधुनिक आवृत्ती आम्हाला मिळाली आहे. कीव्हमध्ये याची चाचणी घेतली जात आहे. काही दिवसांतच आम्ही आमच्या इतर शहरांत हे इन्स्टॉल करू. याच्या तैनातीनंतर कोणतेही क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा दुसऱ्या प्रोजेक्टाईल हल्ल्यांपासून नागरिकांना वाचवता येईल.
वास्तविक, या हायटेक प्रणालीला अद्याप नाव देण्यात आलेले नाही आणि याच्या आधीच ते युक्रेनला सोपवण्यात आले आहे. डिफेन्स पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हे 'टूल अर्ली एअर अटॅक वॉर्निंग सिस्टिम' आहे. जर एखाद्या शहरी भागावर एखादा क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा प्रोजेक्टाईल हल्ला झाला तर ही प्रणाली लगेच अलर्ट पाठवेल. यातून लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी जाता येईल.
काही वृत्तांत म्हटले आहे की, ही प्रणाली काऊंटर अटॅकही करू शकेल. म्हणजेच जे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. त्यालाही हे हाणून पाडेल. याच्या वापराने सामान्य नागरिकांचे प्राण वाचवता येतील.
झेलेन्स्कींनी नेतन्याहूंची मदत मागितली
मार्चमध्ये इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन युक्रेनला गेले होते. तिथे ते राष्ट्रपती झेलेन्स्कींना भेटले होते. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी इस्रायलकडे सैन्य मदतीची मागणी केली होती. तेव्हा इस्रायलमध्ये या क्षेपणास्त्ररोधी प्रणालीची चाचणी सुरू होती. या प्रणालीचा वापर अजून इस्रायलमध्ये झालेला नाही. याची थेट तैनाती युक्रेनमध्येच केली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.