आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​युक्रेनवरील हल्ल्याचा 38 वा दिवस:​​​​​​​युनेस्कोचा दावा -युद्धात 50 हून जास्त ऐतिहासिक इमारतींचे झाले नुकसान, रशियाने ओडेसा शहरावर डागली 3 क्षेपणास्त्रे

कीव्ह5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाच्या 38 व्या दिवशी 'संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था' अर्थात 'युनेस्को'ने रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील 53 ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. यात 29 धार्मिक स्थळ, 16 ऐतिहासिक इमारती, 4 संग्रहालय व 4 स्मारकांचा समावेश आहे.

हे छायाचित्र युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चचे आहे. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात या चर्चचा वरचा भाग कोसळला.
हे छायाचित्र युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चचे आहे. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात या चर्चचा वरचा भाग कोसळला.

दुसरीकडे, रशियाच्या ओडेसा शहराच्या नागरी वस्त्यांत रशियाने शनिवारी 3 क्षेपणास्त्र डागले. गव्हर्नर मॅक्सिम मार्चेंको यांनी या घटनेची माहिती देताना या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचा दावा केला आहे.

रशियन सैनिकांकडून बालकांना मानवी ढालीसारखा वापर

युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रशियन सैनिकांवर मुलांचा मानवी ढालीसारखा वापर करण्याचा आरोप केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल अॅलेक्झांडर मोटुज्यानिक यांनी सांगितले -शत्रू आपला ताफा व वाहनांना घेऊन जाताना युक्रेनीयन मुलांचा मानवी ढालीसारखा वापर करत आहे. मुलांच्या पालकांनी युक्रेनच्या सैनिकांना रशियन सैनिकांच्या हालचालींची माहिती देऊ नये यासाठी ते असे करत असल्याचे ते म्हणालेत.

इतर अपडेट्स...

 • रशियासोबतच्या आण्विक तणावामुळे अमेरिकेने आपल्या LGM-30G Minuteman III या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी रद्द केली आहे.
 • अमेरिकन परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी संवाद साधला.
 • राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले -मारियुपोल येथील 3 हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आले.
 • रशियन सैनिकांनी खार्किव्ह शहरातील गॅस पाईपलाईवर क्षेपणास्त्राने हल्ला केला.
 • स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सैनिकांनी कीव्ह लगतच्या बोरोदियांका व बुका शहर रशियाकडून पुन्हा ताब्यात घेतले आहे.
 • अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रशियन सैनिक कीव्हवर हल्ला करण्यासाठी राजधानीच्या वायव्येस असणाऱ्या एका चर्चचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.
संयुक्त राष्ट्राने या युद्धात आतापर्यंत युक्रेनच्या 41 लाखांहून अधिक नागरिकांनी पलायन केल्याचा आरोप केला आहे.
संयुक्त राष्ट्राने या युद्धात आतापर्यंत युक्रेनच्या 41 लाखांहून अधिक नागरिकांनी पलायन केल्याचा आरोप केला आहे.

युक्रेनच्या नुकसानीवर एक नजर

 • मायकोलाईव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्राने एका इमारतीचा वेध घेतला होता. त्यात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
 • स्लाव्हुतिचचे महापौरांनी रशियन सैनिकांनी आतापर्यंत 200 चेर्नोबिल गार्ड्सला बंदी बनवल्याचा आरोप केला आहे.
 • युनेस्कोने रशियाच्या हल्ल्यात यु्क्रेनच्या 53 ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
 • रशिया व युक्रेन हे दोन्ही देश युद्धात एकमेकांचे मोठे नुकसान केल्याचा दावा करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...