आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये बघा युक्रेनच्या विनाशाचे दृश्य:सर्वत्र विखुरलेले मृतदेह; अंडरग्राउंड शेल्टरमध्ये झाला मुलीचा जन्म, लोक म्हणाले - आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा फोटोज...

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हजारो लोक शहर सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होताना दिसत आहेत. कार, ​​बस, ट्रेन आणि पायी का होईना तेथील नागरिक पोलंड-हंगेरीच्या दिशेने निघाले आहेत. काही लोक शेल्टर आणि अंडरग्राउंड सब वेमध्ये राहात आहेत. लवकरच सर्व काही सामान्य होईल, अशी आशा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. बघा युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांचे फोटो -

सर्वप्रथम बोलुयात युद्धाबद्दल:

रशियाने शनिवारी सकाळी कीव्हमधील अनेक भागात क्षेपणास्त्र हल्ले केले. या फोटोमध्ये एक स्फोट दिसत आहे. येथे युक्रेन आणि रशियन सैन्य यांच्यात सामना सुरू आहे.

मुलीचा जन्म ठरला आशाचे किरण :

कीव्हमध्ये एका 23 वर्षीय महिलेने मेट्रो स्टेशनमध्ये बांधलेल्या शेल्टरमध्ये एका बाळाला जन्म दिला. या मुलीचे 'मिया' असे नाव ठेवण्यात आले आहे.

महिला आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. बॉम्बस्फोटादरम्यान लोक याला आशेचा किरण म्हणत आहेत. कमी सुविधांमध्येही ही मुलगी जन्माला आली हा चमत्कार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. आई म्हणाली - तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी खूप तणावाखाली होते.

आता विनाशाबद्दल बोलुयात... युक्रेनमध्ये 200 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले -

डोनेस्कमध्ये युक्रेनच्या लष्करी हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह तिच्या घराबाहेर सापडला. मात्र, कोणीतरी त्याच्या जॅकेटने मृतदेहाचा चेहरा झाकला.

रशियन हल्ल्यात हा जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवस त्यांचे अंतिम संस्कारही होऊ शकले नाहीत.

युक्रेनच्या अनेक भागात सैनिकांचे मृतदेह बेवारस पडलेले दिसत आहेत. त्यांना उचलायला कोणी येत नाही. स्थानिक नागरिक याची माहिती प्रशासनाला देत आहेत.

आता बोलुयात स्थलांतराबद्दल... रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

हा फोटो कीव्हमधील एका रेल्वे स्टेशनचा आहे, जिथे मोठ्या संख्येने लोक पोहोचत आहेत. प्रत्येकाला देश सोडण्याची किंवा सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याची घाई आहे.

आपल्या मुलासह कीव्हमधून बाहेर पडलेल्या या महिलेच्या चेहऱ्यावर घर सोडण्याची असहायता आणि निराशा दिसत आहे.

रस्ते निर्मनुष्य, लोक घरात आणि सुरक्षित ठिकाणी लपले:

कीव्ह शहरातून जाणारे रस्ते निर्जन आहेत. येथे एकतर पोलिसांची वाहने गस्त घालत आहेत किंवा अतिशय महत्त्वाच्या कामासाठी निघालेले लोक दिसत आहेत.

वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या सॅटेलाइट इमेजमध्ये रशियन हेलिकॉप्टर आणि टँकचे फॉर्मेशन दिसत आहे.

युक्रेनमधून पलायन सुरू आहे:

हा फोटो स्लोव्हाकियातील एका निर्वासित शिबिराचा आहे. युक्रेनमधील महिला आणि त्यांच्या मुलांना येथे ठेवण्यात आले आहे.

युक्रेनच्या सीमेवर युक्रेनियन नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. केवळ महिला आणि मुलांना देश सोडण्याची परवानगी आहे. एक महिला आपल्या मुलांसह पोलंडला गेली.

हा फोटो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचा आहे. रशियाच्या विरोधात निंदा प्रस्ताव मंजूर झाल्यावर युक्रेनचे राजदूत सर्गेई किसलित्सा नाराज झाले. या प्रस्तावाच्या बाजूने 11 आणि विरोधात 1 मते पडली. भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानात भाग घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...