आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यामुळे तेथील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असून, त्यामुळे भारतीय नागरिकांना एयर लिफ्ट करण्यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानालाही मार्गावरून परतावे लागले आहे. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने प्लॅन-बीवर काम सुरू केले आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत.
दुसरीकडे युक्रेनमधील भारतीय नागरिक सीमा ओलांडून हंगेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी हंगेरीतील भारतीय दूतावासाचे एक विशेष पथक युक्रेन सीमेवरील जोहानाई येथे पाठवण्यात आले आहे. तिथे येणाऱ्या भारतीयांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही टीम मदत करेल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी आज रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलू शकतात.
अपडेट्स...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.